शेवटच्या क्षणीही 'तो' काम करत राहिला, PHOTO पाहून अंगावर येईल काटा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
शिक्षक प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग असतो. आयुष्याच्या कठीण काळात, शिक्षणामध्ये वेळोवेगळी योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक हे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. त्यामुळे त्यांना गुरुचे स्थान दिले जाते.
नवी दिल्ली: शिक्षक प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग असतो. आयुष्याच्या कठीण काळात, शिक्षणामध्ये वेळोवेगळी योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक हे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. त्यामुळे त्यांना गुरुचे स्थान दिले जाते. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच चांगलं करत असतात त्यामुळे त्यांचं योगदान हे खूप असतं. अशा अनेक शिक्षकांच्या घटना समोर येत असतात जे आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगलं काम करतात. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एक शिक्षकाने आयुष्याच्या शेवटच्या काळातही विद्यार्थ्यांसाठी योगदान दिलं.
एका शिक्षकाच्या मुलीने त्यांच्या शेवटच्या क्षणीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये शिक्षक हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाशी लढत विद्यार्थ्यांचे पेपर चेक करत आहे. हा फोटो पाहून अनेक लोक भावूक झाले असून त्यांच्या कामाचं कौतुकही करत आहे.
शिक्षक वडिलांचा फोटो शेअर करत मुलीनं लिहिलं, वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये आणलं. यानंतरही त्यांनी विद्यार्थ्यांशी एकनिष्ठ राहत त्याचं काम केलं. हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसत होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे जग सोडले. शिक्षिकाची मुलगी सँड्राने लिहिले की, एक शिक्षक आपल्या कामासाठी इतका जास्तीचा वेळ देतो, ज्याची जाणीवही अनेकांना नसते. महामारीच्या काळात किंवा बिघडलेल्या आरोग्याच्या काळातही शिक्षकांना त्यांची कर्तव्ये पार पाडण्याची काळजी असते.
advertisement
advertisement
सध्या शिक्षकाचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा फिरतोय. अनेक कमेंट लाईक्सही या फोटोवर पहायला मिळत आहेत. असे क्वचित लोक असतात जे आपल्या कामाबद्दल, कर्तव्याबद्दल एकनिष्ठ असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2024 7:57 AM IST







