2,588 वर्षांनंतर येतोय ‘दुर्मिळ होळी योग’, आरोग्यदायी जीवनासाठी उत्तम संधी, फक्त 'ही' गोष्ट करा, व्हायरल पोस्टने इंटरनेटवर चर्चा

Last Updated:

इतक्या वर्षांनी येणारा होळी योग अर्थात स्पेशल असणार आणि त्यामुळे या दिवशी काय करावं लागणार हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. इथे अनेक गोष्टी रातोरात ट्रेंड होतात. कधीकधी सर्वसामान्य मुद्दा देखील इथे ट्रेंड होतो. ज्याची सर्वत्र चर्चा होते. अशीच होळीसंबंधीत एक गोष्ट सध्या इथे चर्चेचा विषय ठरली आहे.
होळी आता तोंडावर आली आहे आणि 'यावर्षीचा दुर्मीळ होळी योग आहे, जो तब्बल 2,588 वर्षांनंतर येत आहे.' हे आम्ही नाही तर सोशल मीडियावरील पोस्ट सांगत आहे. या दुर्मिळ होळी योगाला काहीतरी विशेष करण्यासाठी देखील यामध्ये सांगितलं गेलं आहे, ज्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक सरसावले.
इतक्या वर्षांनी येणारा होळी योग अर्थात स्पेशल असणार आणि त्यामुळे या दिवशी काय करावं लागणार हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
advertisement
इंस्टाग्रामवर विनय सिंग मकवाना नावाच्या एका वापरकर्त्याने एका जुन्या वर्तमानपत्रातील कात्रणाची पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, 2588 वर्षांनी येणारा हा अद्भुत योग आहे, जो यावर्षीच्या होळीला खास बनवतो. हा योग आरोग्याच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतो, असं देखील सांगितलं जात आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, होळीच्या रात्री होलिका दहन करताना एक खास उपाय केल्यास भूक न लागणे, झोप न येणे, डोळ्यांचे विकार आणि आळस यांसारख्या समस्या दूर होतील.
advertisement
हा उपाय अगदी सोपा आहे पण तितकाच अजबही आहे. होलिका दहन सुरू असताना, आपला मोबाईल फोन आपल्या स्वत:च्या डोक्याभोवती गोलगोल फिरवा, असं सात वेळा करा आणि तो फोन आगीत टाका. ऐकून धक्का बसला ना? पण घाबरु नका तुमचा खरा फोन आगीत टाकायचा नाही तर तुम्हाला खोटा फोन टाकायचा आहे, असं केल्याने दोन दिवसांत चिडचिड, मळमळ यांसारख्या तक्रारी दूर होतील असा दावा या पोस्टमध्ये केला आहे.
advertisement
या अशा अजब-गजब पोस्टने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि अनेकांना याची मजेशीर बाजूही आवडली आहे.
एका आठवड्यात या पोस्टला 2 लाखांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाले आहेत. अनेकजणांनी कबूल केले की सुरुवातीला त्यांना ही पोस्ट खूप गंभीर वाटली होती आणि ते हा उपाय करून पाहण्यास उत्सुक होते. पण नंतर ही एक मजेशीर गोष्ट असल्याचं समोर आलं आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहेत. काही लोक याला मजेदार म्हणत आहेत. तर काही लोक काय हा मुर्खपणा? असं म्हणून सोडून देत आहेत.
advertisement
हा विनोद सोशल मीडियावर चांगलाच गाजला आहे. इथे शेअर केल्या गेलेल्या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसला तरी, उत्सवाच्या मूडमध्ये ही पोस्ट लोकांमध्ये आनंद वाटणारी आहे.
मराठी बातम्या/Viral/
2,588 वर्षांनंतर येतोय ‘दुर्मिळ होळी योग’, आरोग्यदायी जीवनासाठी उत्तम संधी, फक्त 'ही' गोष्ट करा, व्हायरल पोस्टने इंटरनेटवर चर्चा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement