एकावं ते नवलंच! चोरीला गेलेली म्हैस इन्स्टाग्रामच्या Reels मध्ये दिसली, शेतकऱ्याने गाठलं पोलिस स्टेशन
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
शेतकऱ्याची म्हैस एक वर्षापूर्वी चोरली गेली होती. पोलिसांना काहीही सुगावा लागला नव्हता. नंतर त्याला इंस्टाग्रामवर त्याची म्हैस दिसली. तो पोलिसांच्या मदतीने त्याची म्हैस परत घेऊन आला. या घटनेमुळे पोलिसांची कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
भारतात अनेकदा पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचतात असे बोलले जाते. याची अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत. बुलंदशहरमधील एका शेतकऱ्याची म्हैस चोरीला गेल्याचा गुन्हा एका वर्षापूर्वी नोंदवला गेला होता, पण अजूनही पोलिसांना काहीच तपास लागत नव्हता. मात्र, वर्षानंतर स्वतः शेतकऱ्यानेच त्याची म्हैस ओळखली.
गुलावटी पोलीस ठाण्याच्या कैथला गावातून वर्षभरापूर्वी एका शेतकऱ्याची म्हैस चोरीला गेली होती. त्याने पोलिसात तक्रार केली होती, पण पोलिसांना काहीच तपास लागला नाही. वर्षभरानंतर म्हैस चोरीचा मुद्दा सगळ्यांनी विसरला होता. मात्र, एक महिन्यापूर्वी स्वतः शेतकऱ्याने इन्स्टाग्रामवर एका म्हशीचा व्हिडिओ पाहिला आणि ती त्याचीच चोरीची म्हैस असल्याचं ओळखलं.
इन्स्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये केरी मनीहार गावात म्हैस दिसली होती. मोहितने ते पाहून पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली. पोलिसांसोबत तो थेट केरी मनीहारमधील शेतकरी परविंदरकडे पोहोचला. या शेतकऱ्याने सांगितले की त्याने ही म्हैस शामली येथील भूराकडून विकत घेतली आहे. पोलिसांनी त्याला भूराला बोलवायला सांगितलं. चोरीची म्हैस असल्याचं समोर आलं आणि शेतकऱ्याला त्याची म्हैस मिळाली.
advertisement
गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, या परिसरात पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक लोकांचे जनावरे चोरीला गेली आहेत, पण ती सापडत नाहीत. पोलिसांनी या घटनांमध्ये गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे जनावरे चोरीला जातात, असाही आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2024 11:18 AM IST
मराठी बातम्या/Viral/
एकावं ते नवलंच! चोरीला गेलेली म्हैस इन्स्टाग्रामच्या Reels मध्ये दिसली, शेतकऱ्याने गाठलं पोलिस स्टेशन