विचित्र प्रकार! माशाला पाजली जातेय दारू, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप, दारूमुळे माशाचं काय होतं? पहा VIDEO
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सोशल मीडियावर एका व्यक्तीने रोहू माशाला बिअर पाजल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काहींनी याला मजेदार म्हणत हशा केला, तर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला. PETA नेही कारवाईची मागणी केली आहे. संशोधनानुसार...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रोहू माशाला दारू पाजताना दिसत आहे. या व्हिडिओने ऑनलाइन जोरदार वाद निर्माण केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती माशाला पाण्यातून काढून हातात घट्ट पकडतो आणि दुसऱ्या हातात बिअरची बाटली धरतो. तो व्यक्ती माशाच्या तोंडात दारू ओततो, जी मासा पितो. मासा वारंवार तोंड उघडतो आणि तो व्यक्ती बिअरची बाटली त्याच्या तोंडाजवळ ठेवून त्याला दारू पाजतो आणि हसतो. दारू पाजणाऱ्या व्यक्तीसोबत व्हिडिओमध्ये आणखी एक व्यक्ती दिसत आहे आणि दोघेही हसतायत.
उलट-सुलट प्रतिक्रियांनी व्हिडीओ व्हायरल
हे विचित्र दृश्य पाहून, एका बाजूला सोशल मीडिया वापरकर्ते याला मजेदार आणि मनोरंजक व्हिडिओ म्हणत आहेत, तर दुसरीकडे काही वापरकर्ते याला प्राणी क्रूरता म्हणत जोरदार टीका करत आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे आणि कधी रेकॉर्ड केला गेला, हे समजू शकलेलं नाही, पण दोन्ही लोकांच्या वेशभूषेवरून हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असू शकतो, असं दिसतंय.
advertisement
कारवाईची केली जातीय विनंती
एका दिवसापूर्वी, indianrareclips नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला. अपलोड होताच, लोकांनी हा व्हिडिओ पाहण्यास आणि त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी माशाला 'किंगफिशर' म्हणत खिल्ली उडवली, तर काहींनी या घटनेवर टीका करत याला प्राणी क्रूरता म्हटलं. अनेक युजर्सनी त्यांच्या चिंता आणखी पुढे नेऊन त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये 'पेटा' (People for the Ethical Treatment of Animals) या संस्थेला टॅग केलं आणि प्राणी क्रूरतेविरोधात कारवाई करण्याची विनंती केली.
advertisement
advertisement
मासे खरंच दारू पिऊ शकतात का?
अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात झेब्राफिश (प्रयोगशाळेतील अभ्यासांमध्ये वापरली जाणारी एक प्रजाती) वर केलेल्या संशोधनात असं सिद्ध झालं आहे की, अल्कोहोलच्या (EtOH) संपर्कात आल्याने माशांच्या वर्तनावर परिणाम होतो. अभ्यासात असं दिसून आलं की, मध्यम प्रमाणात नशेत असलेले मासे गटात वेगाने पोहतात, अनेकदा शुद्धीत असलेल्या माशांच्या पुढे. संशोधनात असंही उघड झालं आहे की, अल्कोहोल माशांसाठी हानिकारक असू शकतं. त्यांची पोहण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि त्यांच्या शरीरात विषारीपणा येऊ शकतो. जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, मासे मानवांपेक्षा वेगळ्या पद्धतीने अल्कोहोलवर प्रक्रिया करतात, परंतु अल्कोहोलच्या दीर्घकालीन संपर्कामुळे मज्जासंस्था आणि इतर अवयवांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/Viral/
विचित्र प्रकार! माशाला पाजली जातेय दारू, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप, दारूमुळे माशाचं काय होतं? पहा VIDEO









