Success Story: लालबागच्या मयंकने सुरू केला स्वत:चा फूड ब्रँड, मोमोज विकून महिन्याला इतकी कमाई
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
लालबाग गणेशगल्ली परिसरात मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उभा राहिलेला एक तरुण उद्योजक सध्या अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. मयंक खांदारे असे या तरुणाचे नाव असून अगदी छोट्या फूड कार्टपासून सुरुवात करून आज त्याने स्वतःचा यशस्वी फूड ब्रँड उभारला आहे.
लालबाग गणेशगल्ली परिसरात मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उभा राहिलेला एक तरुण उद्योजक सध्या अनेकांसाठी प्रेरणा स्थान ठरत आहे. मयंक खांदारे असे या तरुणाचे नाव असून अगदी छोट्या फूड कार्टपासून सुरुवात करून आज त्याने स्वत:चा यशस्वी फूड ब्रँड उभारला आहे. मयंकने सुरुवातीला गणेशगल्ली येथे एक छोटी फूड कार्ट टाकून मोमोज विक्री सुरू केली. त्याच्या मोमोजची चव लवकरच परिसरात प्रसिद्ध झाली आणि अल्पावधीतच ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला. नियमित येणार्या ग्राहकांनी केवळ कौतुकच केले नाही तर मयंकला मेनूमध्ये आणखी पदार्थ समाविष्ट करण्याचा सल्लाही दिला.
ग्राहकांच्या अपेक्षा आणि विश्वास लक्षात घेऊन मयंकने पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. फूड कार्टच्या यशानंतर मयंकने गणेशगल्ली परिसरात एक छोटे दुकान घेतले. या दुकानात आता केवळ मोमोजच नव्हे, तर पिझ्झा, बर्गर, फ्राईज, नगेट्स तसेच विविध स्नॅक्स आयटम्स उपलब्ध आहेत. चव, स्वच्छता आणि परवडणारे दर यामुळे “खाओमोर” या त्याच्या फूड ब्रँडला ग्राहकांची पसंती मिळत आहे. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. व्यवसाय सुरू करताना मयंकला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रस्त्यावर फूड कार्ट लावण्यास विरोध, वीजपुरवठ्याची समस्या, तसेच सुरुवातीच्या आर्थिक अडचणी यामुळे अनेक वेळा खचून जाण्याची वेळ आली.
advertisement
पण हार न मानता त्याने प्रत्येक अडचणीवर तोडगा काढत पुढे वाटचाल सुरू ठेवली. आज “खाओमोर” या व्यवसायातून मयंक दरमहा सुमारे 40 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे. या यशामागे त्याच्या कुटुंबीयांचा, मावशीचा आणि मित्रांचा मोठा पाठिंबा असल्याचे तो आवर्जून सांगतो. वेळोवेळी त्यांनी दिलेली साथ आणि मदत मयंकसाठी मोलाची ठरली. इतर तरुणांना संदेश देताना मयंक म्हणतो, “स्वत: काम करा, स्वत: शिका आणि अनुभव घ्या. कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहू नका. मेहनत आणि सातत्य ठेवलं तर यश नक्की मिळतं.” मयंक खांदारेची ही यशोगाथा आज अनेक नव उद्योजकांसाठी प्रेरणा ठरत आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 9:29 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Success Story: लालबागच्या मयंकने सुरू केला स्वत:चा फूड ब्रँड, मोमोज विकून महिन्याला इतकी कमाई









