बकरी बनली 'कमांडर', शेकडो ब्रिटिश सैनिकांचा वाचवले प्राण; वाचा 'जनरल बैजू'ची अद्भुत कहाणी!

Last Updated:

पहिल्या महायुद्धादरम्यान, गरवाल रायफल्सचे सैनिक अफगाण युद्धाच्या आघाडीवर होते आणि अन्नाभावी भुकेले होते. अचानक एका जाडजूड बकरीने त्यांना जमिनीखाली...

General Baiju story
General Baiju story
पहिल्या महायुद्धाशी संबंधित एक घटना खूप प्रसिद्ध आहे, जेव्हा एक बकरी ब्रिटिश सैन्यात जनरलच्या पदापर्यंत पोहोचली होती. ही घटना पहिल्या महायुद्धाच्या वेळची आहे, जेव्हा भारत ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता. अफगाणिस्तान आणि ब्रिटिशांमध्ये युद्ध सुरू होतं. उत्तराखंडमधील गडवाल रायफल्सची एक तुकडीही आघाडीवर पाठवण्यात आली होती. या बकरीचा उल्लेख डॉ. रणवीर सिंह यांच्या 'लॅन्सडाउन: सिव्हिलायझेशन अँड कल्चर' या पुस्तकात करण्यात आला आहे.
अचानक झुडपांमधून आली एक बकरी
पुस्तकानुसार, अँग्लो-अफगाण युद्धादरम्यान, गडवाल रायफल्सच्या सैनिकांना बराच काळ रणांगणावर थांबावं लागलं होतं. अन्न संपलं होतं. अनेक दिवसांपासून भुकेले सैनिक काहीच विचार करू शकत नव्हते. अचानक झुडपं हलू लागली. सैनिकांना वाटलं की, काही शत्रू दबा धरून बसले आहेत, म्हणून त्यांनी बंदुका रोखल्या. ते गोळीबार करण्यासाठी तयार होते, तेव्हा अचानक झुडपांमधून एक लठ्ठ आणि उंच बकरी बाहेर आली.
advertisement
बकरीने मिटवला सैनिकांच्या भूकेचा प्रश्न
अनेक दिवसांपासून भुकेल्या सैनिकांनी बकरीला मारून खाण्याचा विचार केला. जेव्हा ते तिला पकडायला गेले, तेव्हा ती बकरी पळून जाऊ लागली. सैनिक तिच्या जवळ आले, तेव्हा ती माती खोदायला लागली. सैनिकांनी पाहिलं की, जमिनीखाली बटाटे होते. यानंतर, सैनिकांनी एका बाजूने जमीन खोदण्यास सुरुवात केली. तिथून खूप बटाटे निघाले.
advertisement
बकरी बनली 'जनरल बैजू'
सैनिकांसाठी अनेक दिवसांच्या जेवणाची सोय झाली. त्या बकरीने शेकडो सैनिकांना भुकेने मरण्यापासून वाचवलं. म्हणूनच, तिला लॅन्सडाउनला आणण्यात आलं आणि 'जनरल बैजू' चा दर्जा देण्यात आला. तिच्यासाठी तिथे एक खोली तयार करण्यात आली होती, ज्यात तिच्या खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी ठेवल्या होत्या. याव्यतिरिक्त, ती लॅन्सडाउन मार्केटमधील कोणत्याही दुकानातून काहीही खाऊ शकत होती. ज्याचे पैसे तत्कालीन सरकार भरायचे.
advertisement
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बकरी बनली 'कमांडर', शेकडो ब्रिटिश सैनिकांचा वाचवले प्राण; वाचा 'जनरल बैजू'ची अद्भुत कहाणी!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement