Shocking! आईने 5 वर्षीय लेकीच्या नखांना नेलपेंट लावली, मुलीला दोनदा Heart attack
- Published by:Priya Lad
Last Updated:
नेलपेंट लावताना 5 वर्षांची मुलगी कोमात गेली, ती मृत्यूपासून थोडक्यात बचावली. यामागील कारण जाणून घेणं सर्वांना महत्त्वाचं आहे.
नवी दिल्ली : बहुतेक महिला नेलपेंट लावतात. अगदी लहान मुलींनाही नेलपेंट लावायला आवडतं. अशीच एक 5 वर्षांची मुलगी जिची आई तिला नेलपेंट लावत होती आणि मुलीला अचानक हार्ट अटॅक आला. मुलगी मृत्यूच्या दारात पोहोचली. हे वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल. असं कसं काय घडू शकतं? असा प्रश्न पडला असेल.
यूकेमधील 5 वर्षांची एला, जिची आई जेम्मा ग्रिफिन्स तिला नेलपेंट लावत होती. दोघी मायलेकी हसत, खेळत होत्या. याच दरम्यान मुलीचा श्वास अचानक थांबला आणि काही वेळातच ती मृत्यूच्या दारात पोहोचली. या घटनेबद्दल सर्वांना माहिती असणं महत्त्वाचं आहे कारण हे कोणासोबतही घडू शकतं. जेम्मा ग्रिफिन्स आता सर्वांना आवाहन करत आहेत की सर्वांना याबद्दल माहिती असायला हवी.
advertisement
डेली स्टारच्या वृत्तानुसार, ही घटना गेल्या वर्षी 26 ऑक्टोबर रोजी घडली. याबद्दल बोलताना, एलाच्या आईने सांगितलं की ती तिच्या मुलीच्या नखांवर नेलपेंट लावत होती लावत होती आणि ते एका जोकवर हसत होते. दरम्यान, तिचा श्वास अचानक थांबला. तिने तिला सीपीआर देण्यास सुरुवात केली. सुदैवाने तिच्या शेजारी एक पॅरामेडिक होता ज्याने तिला मदत केली. दरम्यान, रुग्णवाहिका आली आणि मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत मुलगी कोमात गेली होती.
advertisement
एलाला नेमकं काय झालं?
जेम्मा म्हणते की सीटी स्कॅनमध्ये असं दिसून आलं की तिच्या मुलीला इतक्या लहान वयातच हृदयविकाराचा झटका आला होता. एवढंच नाही तर रुग्णालयात उपचार सुरू असताना एका महिन्यात पुन्हा एकदा अटॅक आला.
डॉक्टरांनी सांगितलं, तिला CPVT म्हणजेच कॅटेकोलामिनर्जिक पॉलीमॉर्फिक व्हेंट्रिक्युलर टाकीकार्डिया नावाचा आजार आहे, जो हृदयाच्या ठोक्यावर परिणाम करतो. जरी एका महिन्यानंतर मुलीला डिस्चार्ज देण्यात आला, तरीही तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल आणि तिच्या हृदयाचे ठोके सतत मॉनिटरद्वारे निरीक्षण करावे लागतील. आता आई जेम्मा लोकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता पसरवत आहे आणि शस्त्रक्रियेसाठी पैसेही गोळा करत आहे.
Location :
Delhi
First Published :
February 04, 2025 7:44 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Shocking! आईने 5 वर्षीय लेकीच्या नखांना नेलपेंट लावली, मुलीला दोनदा Heart attack