लोकांनी समजवलं पण तिनं मेट्रो स्टेशनच्या छतावरुन मारली उडी, हृदयद्रावक VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव, अडचणी या असतातच. मात्र काही लोक याचा सामना करु शकत नाही आणि टोकाचं पाऊल उचलतात. आजकाल काही लोक तर क्षुल्लक कारणावरुनही जीव संपवण्याचा विचार करतात.
नवी दिल्ली : प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव, अडचणी या असतातच. मात्र काही लोक याचा सामना करु शकत नाही आणि टोकाचं पाऊल उचलतात. आजकाल काही लोक तर क्षुल्लक कारणावरुनही जीव संपवण्याचा विचार करतात. सध्या एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक मुलगी आपला जीव देण्याची धमकी देत आहे. ती मेट्रो स्टेशनच्या छतावरुन उडी मारते. हा घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे.
एका तरुणीच्या कृत्यानं सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहेत. तिचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
तरुणीच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी मेट्रो स्टेशनच्या छतावर उभी आहे. ती तेथून उडी मारण्याची धमकी देतेय. आजूबाजूला पोलीस आणि लोकही जमा झालेत. सगळेजण मिळून तिला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ती कोणाचं ऐकायलाच तयार नाही. काही सेकंदातच ती तेथून खाली उडी मारते. हे दृश्य मन हेलवणारं आहे.
advertisement
Saving Lives...
Prompt and prudent response by CISF personnel saved life of a girl who jumped from Akshardham Metro Station. #PROTECTIONandSECURITY #Humanity @PMOIndia@HMOIndia@MoHUA_India#15yearsofCISFinDMRC pic.twitter.com/7i9TeZ36Wk— CISF (@CISFHQrs) April 14, 2022
मुलगी उडी मारेपर्यंत खाली उभ्या असलेल्या लोकांनी एक चादर घेऊन तिला वाचवण्यासाठी पुढे करुन ठेवली होती. म्हणजे ती खाली पडली तरी त्या चादरीत पडेल आणि तिचा जीव वाचेल. आणि तेच झालं. मुलीनं उडी मारली आणि ती थेट त्या चादरीत येऊन पडली. लोकांच्या या कृतीनं तरुणीचे प्राण वाचले.
advertisement
@CISFHQrs नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात येणार आहे. 28 सेकंदांचा हा व्हिडीओ खूपच भयंकर असून पाहूनच अंगावर काटा उभा राहिल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2024 7:52 PM IST







