advertisement

तरुणीने 11 कोटी रुपयांची जिंकली लाॅटरी, पहिल्यांदा बाॅयफ्रेंडशी केलं ब्रेकअप, आता नव्या मुलासोबत करतेय ऐश!

Last Updated:

ब्रिटनमधील चार्लट कॉक्सने स्क्रॅच कार्डवर 11 कोटींची लॉटरी जिंकल्यावर लगेचच आपला बॉयफ्रेंड मायकेलला सोडले. तिने नवीन प्रियकर काइली ईस्टसाठी BMW खरेदी केली आणि नवीन व्यवसाय सुरू केला. दरम्यान...

Viral News
Viral News
आपण जेव्हा कोणासोबत असतो, तेव्हा आपण अपेक्षा करतो की, त्यांनी त्यांच्या चांगल्या वेळेतही आपली आठवण ठेवावी. मात्र, असं होत नाही आणि अनेकदा पैसा किंवा प्रसिद्धी जवळ येताच लोकं त्या लोकांना विसरतात. एका माणसासोबतही असंच काहीसं घडलं, ज्याच्या गर्लफ्रेंडने लॉटरी जिंकताच ब्रेकअप केलं, इतकंच नाही तर नवीन प्रियकर बनवून मजा करायला लागली.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिलेने लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं, पण तिला अपेक्षा नव्हती की, लक्ष्मी तिच्यावर इतकी कृपा करेल. मात्र, त्यानंतर महिलेने जे काही केलं, त्यामुळे तिचा माजी प्रियकर हादरला आहे. ही संपूर्ण कहाणी ऐकून, तुम्हालाही प्रश्न पडेल की, महिलेने तिच्या प्रियकराच्या कोणत्या विश्वासघाताचा बदला घेतला?
लॉटरी जिंकताच गर्लफ्रेंड 'बेईमान' झाली!
शार्लोट कॉक्स नावाच्या महिलेने एक स्क्रॅच कार्ड खरेदी केलं होतं, ज्यावर तिला 10 लाख पौंड म्हणजेच 11 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं. यानंतर महिलेने पहिली गोष्ट केली ती म्हणजे तिचा प्रियकर मायकलसोबत ब्रेकअप आणि सोशल मीडियावर तिच्या संपत्तीचं प्रदर्शन सुरू केलं. इतकंच नाही, तर तिला कायली ईस्ट नावाचा नवीन प्रियकर मिळाला आणि ती त्याच्यासोबत हनिमून करण्यासाठी निघून गेली. तिने ईस्टसाठी 55 लाख 45 हजार रुपयांची BMW कार खरेदी केली आणि दोघांनी मिळून केटरिंगचा व्यवसायही सुरू केला.
advertisement
लाॅटरीचं तिकीट जुन्या बाॅयफ्रेंडच्या पैशांतूनच केलं होतं खरेदी
इतकंच नाही, तर शार्लोटने तिच्या जुन्या प्रियकराला जळवण्यासाठी सोशल मीडियावर अनेक कमेंट्सही केल्या, ज्याची लोकांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली. दरम्यान, शार्लोटने ज्या पैशातून लॉटरीचं तिकीट खरेदी केलं, ते पैसे त्याने ट्रान्सफर केले होते, यावरून मायकलने कायदेशीर कारवाई केली आहे. अशा परिस्थितीत, तिने लॉटरीत जिंकलेले पैसे त्याच्यासोबत वाटून घ्यावेत. मात्र, शार्लोट हे पैसे मायकलने ट्रान्सफर केल्याचं पूर्णपणे नाकारत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
तरुणीने 11 कोटी रुपयांची जिंकली लाॅटरी, पहिल्यांदा बाॅयफ्रेंडशी केलं ब्रेकअप, आता नव्या मुलासोबत करतेय ऐश!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement