तुम्ही जी नेलपॉलिश लावता ती कशी बनते माहिती आहे का? थेट फॅक्टरीतील Video इथे पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
नेलपॉलिश लावणं जितकं सोपं आहे तितकंच ते बनवणं अवघड आहे.
नवी दिल्ली : मुलींना नेलपॉलिश लावणं इतकं आवडतं की त्या बाजारातून वेगवेगळ्या रंगाचे नेलपॉलिश विकत घेतात आणि त्यांच्या ड्रेसच्या रंगानुसार लावतात. नेलपॉलिश लावणं खूप सोपं असले तरी ते बनवणं फार कठीण काम आहे. ही एक अतिशय नाजूक प्रक्रिया आहे. एका नेलपॉलिश कारखान्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.
इंस्टाग्राम अकाउंटचा डिजिटल निर्माता अभिषेक (@thefoodiehat) अनेकदा फॅक्टरीमध्ये जाऊन वस्तू बनवण्याचे रेकॉर्डिंग करतो आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो नेलपॉलिश कारखान्याच्या आतील आहे. नेलपॉलिश बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे आणि हे काम कसं केलं जातं हे या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
नेलपॉलिश बनवण्याची पद्धत
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्वात आधी नेलपॉलिशवर प्रक्रिया केली जात आहे. जेव्हा त्याचे द्रावण तयार होतं, तेव्हा ते इतर काही पदार्थात मिसळलं जातं आणि नंतर एका छोट्या प्लास्टिकच्या बाटलीत भरलं जातं. यानंतर काचेच्या छोट्या बाटल्यांमध्ये हाताने भरलं जात आहे. नंतर त्यावर झाकण ठेवून ते पॅक केलं जाते. शेवटी ती मुलगी नखांवर ती नेलपॉलिश लावताना दिसते.
advertisement
व्हिडीओ प्रतिक्रिया काय?
या व्हिडिओला 1.5 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकानं सांगितलं की नेलपॉलिशमुळे ती जागा कशी दुर्गंधीयुक्त असावी हे त्याच्या लक्षात आलं. एकाने सांगितलं की त्याने प्रथमच नेलपॉलिशची पूर्णपणे रिकामी बाटली पाहिली. एकानं सांगितलं की ही खूप मेहनत आहे. एकाने सांगितलं की, हे लोक दाखवणार नाहीत की त्यात किती रसायने मिसळली असतील, त्यानंतर ही नेलपॉलिश बनवली असेल.
advertisement
तुमची या व्हिडिओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
Location :
Delhi
First Published :
April 15, 2024 12:52 PM IST
मराठी बातम्या/Viral/
तुम्ही जी नेलपॉलिश लावता ती कशी बनते माहिती आहे का? थेट फॅक्टरीतील Video इथे पाहा