Kitchen Jugaad Video : शिडी, टेबल, खुर्ची कशाचीच गरज नाही, फक्त एक बाटली लावा पंखा स्वच्छ होईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Tips in Marathi : टेबल किंवा खुर्चीवर चढून पंखा स्वच्छ करणं म्हणजे कित्येकांसाठी तारेवरची कसरतच. पण हाच पंखा बाटलीने स्वच्छ करण्याचा जबरदस्त आणि सोपा जुगाड, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली : उन्हाळा सुरू झाला की पंख्याचा वापर अधिकच वाढतो. एसी, कुलर सगळ्यांकडेच असतो असं नाही. त्यावेळी पंखाच गरमीपासून आराम देतो. पण पंख्याची हवा जितकी गार तितका तो स्वच्छ करणंही मेहनतीचं काम. टेबल किंवा खुर्चीवर चढून पंखा स्वच्छ करणं म्हणजे कित्येकांसाठी तारेवरची कसरतच. पण हाच पंखा स्वच्छ करण्याचा जबरदस्त आणि सोपा जुगाड, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
सीलिंग फॅन स्वच्छ करायचा म्हटलं की सामान्यपणे आपल्याला टेबल किंवा खुर्ची लागते. कारण तो उंचावर छताला लटकवलेला असतो. अशावेळी आपण घरात एकटेच असू तर तोल जाऊन टेबल, खुर्चीवरून पडण्याची भीतीही असते. शिवाय पंखा हातांनी साफ करताना त्यावरील धूळ आपल्याच अंगावर पडते. पण असा जुगाड ज्यामुळे तुम्हाला सीलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी टेबल किंवा खुर्चीची गरजच पडणार नाही. किंवा हातानेही तो स्वच्छ करण्याची गरज नाही.
advertisement
तुम्हाला विश्वास बसणार नाही फक्त एका बाटलीने तुम्ही पंखा स्वच्छ करू शकता. आता ते कसं काय? पंखा साफ करण्याची ही ट्रिक पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
नेमकं करायचं काय?
व्हिडीओत दाखवल्यानुसार एक प्लॅस्टिकची बाटली घ्यायची आहे. वरचा आणि खालच्या भागाच्या मधोमध दोन बाजूंनी समोरासमोर असा उभा चीर द्यायचा आहे. आता बाटली दोन भागात विभागली जाईल. बाटलीच्या आकाराचेच दोन कापड घ्या. हे कापड गुंडाळून बाटलीच्या कापलेल्या भागात प्रत्येकी एक टाका. त्याभोवती दोरा गुंडाळून घ्या. जेणेकरून कापड बाटलीच्या आत घट्ट बसेल.
advertisement
दोन भागापैकी एका भागाच्या मधोमध छोटासा होल करा. बाटलीचं तोंड कापून ते या छिद्रात बसवा. या झाकण्याच्या तोंडात तुम्हाला एखादा पाईप किंवा दांडा घुसवून तो अडकवायचा आहे. हे तुमचं घरच्या घरी पंखा स्वच्छ करण्याचं उपकरण तयार झालं.
याने पंखा कसा स्वच्छ करायचा?
advertisement
बाटलीचे दोन भाग केल्यानंतर मधला जो रिकामा भाग आहे, तो पंख्यात टाका. यामुळे पंखा खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूकडून स्वच्छ होईल. महिलेनं व्हिडीओमध्ये ते करून दाखवलं आहे.
advertisement
Madhuris creative world युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलं आहे. नेमकं काय आणि कसं करायचं आहे, ते तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता.
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही.)
Location :
Delhi
First Published :
April 27, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : शिडी, टेबल, खुर्ची कशाचीच गरज नाही, फक्त एक बाटली लावा पंखा स्वच्छ होईल