advertisement

कसं मिळतं दारु विकण्याचं लायसन्स? काय आहे यासाठीची प्रोसेस तुम्हाला माहितीय का?

Last Updated:

भारतात दारू विकण्याचा किंवा सर्व्ह करण्याचा परवाना कसा मिळू शकतो? चला जाणून घेऊ.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : हल्ली दारु पिण्याचा ट्रेंड सर्वत्र वाढला आहे. कोणताही कार्यक्रम किंवा पार्टी ही दारु शिवाय पूर्ण होत नाही. या अशा आनंदाच्या प्रसंगी भारतात मोठ्याप्रमाणात दारुचं सेवन केलं जातं. लोक आपापल्या चवी आणि आवडीप्रमाणे दारु निवडतात. भारतात दारू विक्रीसाठी सरकारने काही नियम आणि कायदे केले आहेत. त्यामुळे कोणताही व्यक्ती दारु विकू शकत नाही, तसेच घेऊन फिरु शकत नाही.
कोणाला दारू विकायची असेल किंवा दुकान उघडायचे असेल. त्यामुळे त्याला सरकारकडून परवाना घ्यावा लागतो. भारतात दारू विकण्याचा किंवा सर्व्ह करण्याचा परवाना कसा मिळू शकतो? चला जाणून घेऊ.
भारतात दारूचा परवाना मिळवणे सोपे काम नाही. यासाठी लाखो रुपयांपर्यंत खर्च येतो. परवाना मिळवण्यासाठी सर्वप्रथम उत्पादन शुल्क विभागात परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. त्याची फी ₹ 200000 ते ₹ 2000000 पर्यंत आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. तिथल्या रिलेशन ऑफिसरशी बोलावं लागेल.
advertisement
यानंतर, तुम्हाला महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडून दुकानाचा परवाना तसेच जीएसटी क्रमांक घ्यावा लागेल, याशिवाय दारूच्या दुकानाची एमएसएमईकडे नोंदणी करावी लागेल, त्यानंतर एमएसएमई प्रमाणपत्र देखील घ्यावे लागेल. ही प्रक्रिया तुम्ही ऑनलाइनही करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की दारूची दुकाने उघडण्यासाठी किंवा हॉटेल आणि बारमध्ये दारू विकण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग वेगवेगळ्या किंमतींवर वेगवेगळे परवाने जारी करतो.
advertisement
आवश्यक कागदपत्रे
दारू विक्री परवान्यासाठी अर्ज करताना काही कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये मालमत्तेची कागदपत्रे, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, व्यवसाय पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक, ईमेल आयडी यांचा समावेश आहे.
(ही माहिती सामान्य माहितीवर आधीरीत आहे न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, तसेच मद्यपानास प्रोत्साहन देत नाही, आमचा उद्देश फक्त माहिती पोहोचलण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
कसं मिळतं दारु विकण्याचं लायसन्स? काय आहे यासाठीची प्रोसेस तुम्हाला माहितीय का?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement