तिसऱ्या लग्नाची अनोखी गोष्ट! पुतण्याच्या प्रेमात पडली बायको, पतीने बोलावली पंचायत अन् लावून दिलं लग्न; वाचा सविस्तर

Last Updated:

लखीमपूर खेरी येथील चाखरा गावात एका पतीने आपल्या पत्नीचे मामा मुलासोबत असलेले प्रेमसंबंध पाहून विचित्र निर्णय घेतला. पत्नी आणि तिचा प्रियकर मागील तीन वर्षांपासून...

Love affair
Love affair
असं म्हणतात की, प्रेम आंधळ असतं. कधी कोणावर होईल याचा नेम नसतो. नात्या-नात्यांमध्ये प्रेम होतं आणि त्यातून लग्न जुळवली जातात. परिसरात त्याची जोरदार चर्चा होते. असं एक प्रेम प्रकरण चर्चेत आलं आहे, ते म्हणजे स्वतः पतीने आपल्या पत्नीचं मोठ्या भावाच्या पोराशी अर्थात पुतण्याशी लग्न लावून दिलं. सविस्तर प्रकरण काय आहे, ते पाहुया...
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी भागातील चाखरा एका गावात पंचायतीने घेतलेल्या एका अनोख्या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या गावातील एक पती आपल्या पत्नीचं त्याच्या पुतण्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे वैतागला होता. त्याने पंचायत बोलावली आणि त्याच प्रियकरासोबत आपल्या पत्नीचं लग्न लावून दिलं.
पत्नीचे पुतण्यासोबत होते संबंध
सविस्तर वृत्त असे की, लखीमपूर खेरीच्या निघासन पोलीस ठाण्याच्या चकहरा गावात सुमारे 18 वर्षांपूर्वी या तरुणाचं लग्न झालं होतं. त्यांना तीन मुलंही आहेत. तरुणाचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीचे जवळच राहणाऱ्या त्याच्या चुलत भावाच्या मुलासोबत म्हणजे पुतण्यासोबत प्रेमसंबंध होते. चुलत भाऊही आधीच विवाहित आहे आणि त्यालाही दोन मुलं आहेत. तरुणाने सांगितलं की, त्याला पत्नी आणि पुतण्याच्या संबंधांबद्दल एक वर्षापूर्वी समजलं. त्याने त्यांना अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनीही ऐकलं नाही. उलट, त्याच्या पत्नीने पुतण्यासोबत मिळून त्याला मारहाण केली. खोट्या गुन्हेगारीत फसवले. यामुळे त्याला जेलमध्येही जावं लागलं होतं. नुकताच तो जेलमधून सुटला आहे.
advertisement
पंचायतीने लावून दिलं लग्न!
तरुणाने सांगितलं की, त्याच्या आईलाही भीतीपोटी भावाच्या घरी जावं लागलं होतं. कारण त्याला वाटलं की, त्याची हत्या केली जाईल. त्यामुळे 26 मे रोजी त्याने गावाची पंचायत बोलावली आणि आपल्या पत्नीचं पुतण्यासोबत लावून दिलं. पत्नीचा आरोप आहे की, तिचा पती तिला मारहाण करायचा. दुसरीकडे, पत्नी म्हणते की, तिचं तिच्या चुलत भावाच्या मुलासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्याने तिला साथ दिली. तिचा पती तिला अनेकदा मारहाण करायचा. हे प्रकरण अनेकवेळा पंचायतीत गेलं, पण त्याच्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे तिने तिच्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
advertisement
प्रियकर काय म्हणाला?
मात्र, प्रियकर सतनाम सिंह याचं म्हणणं आहे की, नवरा-बायकोमध्ये भांडणं होत असत, त्यामुळे तो भांडणं सोडवण्यासाठी जायचा. पंचायत आणि कुटुंबीयांनी त्यांच्यावर दबाव टाकून हे नातं जुळवून दिलं आहे. या अनोख्या लग्नाची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात सुरू आहे.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
तिसऱ्या लग्नाची अनोखी गोष्ट! पुतण्याच्या प्रेमात पडली बायको, पतीने बोलावली पंचायत अन् लावून दिलं लग्न; वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement