Gold Price : सोन्याची किंमत 70 हजारांपर्यंत घसरणार? तज्ज्ञांनी जे सांगितलं ते माहित असणं प्रत्येकासाठी गरजेचं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Gold price prediction : मार्केट तज्ज्ञांनी या प्रश्नाचं जे उत्तर दिलं आहे, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. पण त्याआधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, सोन्याचे भाव नक्की का गडगडत आहेत.
लग्नसराईचे दिवस जवळ आले की घराघरात एकच चर्चा सुरू होते, ते म्हणजे 'सोनं' कधी खरेदी करायचं? भारतीय कुटुंबांसाठी सोनं हे केवळ दागिना नाही, तर ती एक भावनिक आणि आर्थिक गुंतवणूक असते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती ज्या प्रकारे चढत आहे, त्याने सर्वसामान्यांची झोप उडवली आहे. कधी अचानक भाव कोसळतात, तर दुसऱ्याच दिवशी मोठी उसळी पाहायला मिळते. अशातच आता एक मोठा प्रश्न सर्वांना सतावत आहे, सोन्याची किंमत पुन्हा 70,000 रुपयांच्या खाली येणार का?
advertisement
advertisement
advertisement
1. अमेरिकन डॉलरची ताकद: अमेरिकेतील राजकीय बदल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत होताना दिसत आहे. जेव्हा डॉलर वधतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी होते. गुंतवणूकदार सोन्यापेक्षा डॉलरमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानतात, ज्यामुळे सोन्याचे भाव दबावाखाली येतात.
advertisement
2. युद्धाची भीती कमी होणे: रशिया-युक्रेन आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. पण आता युद्ध थांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने बाजारातील अनिश्चितता कमी झाली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणारे गुंतवणूकदार आता आपला पैसा काढून शेअर बाजारात लावत आहेत (यालाच 'प्रॉफिट बुकिंग' म्हणतात).
advertisement
advertisement
काय 70,000 चा आकडा गाठणं शक्य आहे?तज्ज्ञांच्या मते, सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपयांपर्यंत खाली येणं ही गोष्ट आता 'अशक्य' राहिलेली नाही. पण, यात एक मोठा पेच आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने आपला महत्त्वाचा आधार गमावला, तर भारतीय बाजारात किमतीत मोठी घसरण पाहायला मिळेल. 70 हजारांपर्यंत घसरण झाली तरी ही प्रक्रिया 'रातोरात' होणार नाही. येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी अस्थिरता असेल. भाव काही दिवस वाढतील आणि मग पुन्हा घसरतील असा कल (Trend) दिसत आहे.
advertisement
ग्राहकांनी आता काय करावं?जर तुम्ही लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तज्ज्ञांनी 'वेट अँड वॉच' (थांबा आणि पाहा) हे धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला आहे.1. घाई नको : किमती घसरत आहेत म्हणून एकाच वेळी सर्व पैसे सोन्यात टाकू नका.2. तुकड्या-तुकड्यांत खरेदी : जेव्हा जेव्हा भाव थोडे कमी होतात, तेव्हा थोड्या प्रमाणात सोने खरेदी करा. यामुळे तुमची सरासरी खरेदी किंमत (Average Cost) कमी राहील.3. सतर्क राहा : जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवा, कारण सध्याचा बाजार पूर्णपणे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चालत आहे.








