घटस्फोट झालाच होता, निकाल बाकी होता, न्यायाधिशांनी असा निर्णय दिली की, पती बसला धक्का!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
चीनमध्ये घटस्फोटाच्या खटल्यात पत्नीने न्यायालयाकडे घरकामासाठी मोबदला मागितला. 2011 मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडप्यात मुलीच्या शिक्षणावरून वाद सुरू होता. 2022 मध्ये पती...
एखादं नातं जुळल्यानं जितका आनंद मिळतो, तितकंच ते नातं तुटल्यानं दुःखही होतं. मात्र, कधीकधी परिस्थिती अशी होते की, दोन लोकांना एकत्र राहणं अशक्य होतं. अशा परिस्थितीत घटस्फोट होतो आणि या दरम्यान पती-पत्नीमध्ये मालमत्तेबाबत तडजोड होते. शेजारील देश चीनमध्येही असंच काहीसं घडत होतं, जेव्हा न्यायाधीशांनी पतीला असं काही सांगितलं की, तो थक्क झाला.
कल्पनेच्या पलिकडे द्यावी लागली रक्कम
पती-पत्नीमध्ये घटस्फोटाचा खटला सुरू होता. जवळपास सर्व गोष्टी निश्चित झाल्या होत्या, त्यानंतर अंतिम निकाल देताना न्यायाधीशांनी असं काही सांगितलं, ज्याचा पतीने विचारही केला नव्हता. हे ऐकून तो हादरला. मालमत्तेची वाटणी आणि मुलांच्या संगोपनात वाटा देणं त्याला माहीत होतं, पण घरकामासाठी त्याला मोठी रक्कम द्यावी लागेल, याची त्याला कल्पना नव्हती.
advertisement
पत्नीची 'घरकामा'साठी पैशाची मागणी
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका वृत्तानुसार, हू आडनावाच्या एका व्यक्तीने 2011 मध्ये लग्न केलं. त्याच वर्षी या जोडप्याला एक मुलगीही झाली. गेल्या काही वर्षांत त्यांच्यात मुलीच्या शिक्षणावरून वाद झाला. अशा परिस्थितीत, हू 2022 मध्ये घर सोडून गेला आणि हे जोडपं वेगळं राहू लागलं. दरम्यान, हूने 2024 मध्ये घटस्फोटाचा खटलाही दाखल केला. अशा परिस्थितीत, पत्नीने मुलीची कस्टडी आणि त्यांच्या संयुक्त मालमत्तेत वाटा मागितला. यासोबतच, पत्नीने असंही सांगितलं की, तिने इतकी वर्षं केलेल्या घरकामाच्या बदल्यात तिला 50 हजार युआन म्हणजे सुमारे 6 लाख रुपये द्यावेत.
advertisement
न्यायालयाच्या निर्णयाने पतीला धक्का
तिने सांगितलं की, तिने घर सांभाळण्यासाठी नोकरी सोडली होती आणि तिने एकटीने मुलीची काळजी घेतली आणि घर सांभाळलं. मार्चमध्ये या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने पतीला मुलीच्या संगोपनासाठी दर महिन्याला पैसे आणि 30 लाख रुपये एकरकमी देण्यास सांगितलं. याशिवाय, त्यांनी पतीला आणखी 30 लाख रुपये देण्याचे आदेश दिले, म्हणजे पत्नीने घरकामासाठी मागितलेल्या 6 लाख रुपयांच्या 5 पट रक्कम. पतीला यामुळे मोठा धक्का बसला आणि न्यायाधीशांनी त्याला सांगितलं की, घरकाम ही केवळ एका व्यक्तीची नाही, तर जोडप्याची जबाबदारी आहे. जर त्याने ते केलं नसेल, तर त्याला पैसे द्यावे लागतील.
advertisement
हे ही वाचा : Video : जंगलाचा राजा थेट घरात, माणसाला उचलून घेऊन गेला सिंह; मदत करायच्या ऐवजी व्हिडिओ शूट करत राहिले लोक
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2025 4:09 PM IST
मराठी बातम्या/Viral/
घटस्फोट झालाच होता, निकाल बाकी होता, न्यायाधिशांनी असा निर्णय दिली की, पती बसला धक्का!









