Video : जंगलाचा राजा थेट घरात, माणसाला उचलून घेऊन गेला सिंह; मदत करायच्या ऐवजी व्हिडिओ शूट करत राहिले लोक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका माणसाने आपल्या मित्रांसोबत जंगलात प्रवेश केला, पण पुढे जे झालं ते कल्पनेपलीकडचं होतं.
मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक प्राणी प्रेमींना हे व्हिडीओ पाहायला आवडते. लहान मुलांप्रमाणेच काही प्राणी खूप निरागस असतात. पण कधी कधी काही जंगली प्राण्यांचा मात्र नेम नाही. ते कोणत्यावेळी कसं रिएक्ट करतील हे काही सांगता येत नाही.
असाच एक हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये सिंहाने एका माणसावर हल्ला केला आहे. नुसता हल्लाच नाही तर त्याने माणसाला खेचत नेलं आहे.
हा भयानक प्रसंगाचा व्हिडीओ नेटकऱ्यांसाठी थरकाप उडवणारा आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका माणसाने आपल्या मित्रांसोबत जंगलात प्रवेश केला, पण पुढे जे झालं ते कल्पनेपलीकडचं होतं. अचानक, समोरून सिंग वेगाने धावत आला! तो सरळ त्या माणसाच्या दिशेने झेपावला. जीव वाचवण्यासाठी तो माणूस पळू लागला आणि तो एका दरवाजातून घरात घुसु पाहात होता. पण तोच सिंहाने त्याला धरला आणि फरफटत नेला. सिंंहाची ताकद या माणसासमोर खूप जास्त होती. ज्यामुळे त्याने माणसाला खेचत नेलं.
advertisement
घाबररेल्या अवस्थेत आणि वेदनेनं तो माणूस जोरात ओरडू लागला, सिंहाने काहीक्षणासाठी त्या माणसाला सोडलं पण तो पुन्हा त्या माणसाला घ्यायला आला. त्याने पुन्हा व्यक्तीला उचलले आणि तो धावू लागला. व्हिडीओत काही माणसं मागे दिसत आहेत. पण त्यांना या माणसाला वाचवण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही.
advertisement
व्हिडीओत पुढे काय घडलं हे कळू शकलेलं नाही. पण असं सांगण्यात येत आहे की सिंह त्या माणसाला घेऊन गेला आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आणि कधीचा आहे हे कळू शकलेलं नाही. पण या व्हिडीओने सर्वांच्या मनात भीती निर्माण केली आहे हे नक्की.
हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ kuldeep__singh_11 या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या घटनेला 'प्राकृतिक न्याय' असं संबोधलं, तर काहींनी 'हे पाहून आता जंगलात पाऊलही टाकणार नाही' असं म्हटलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 20, 2025 3:21 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : जंगलाचा राजा थेट घरात, माणसाला उचलून घेऊन गेला सिंह; मदत करायच्या ऐवजी व्हिडिओ शूट करत राहिले लोक


