पृथ्वीवर एका सेकंदात कितीवेळा वीज कोसळते? 99 टक्के लोकांना हे माहित नाही
- Published by:Devika Shinde
- trending desk
Last Updated:
प्रत्येक सेकंदाला पृथ्वीवर किती वीज कोसळण्याच्या घडतात, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का?
मुंबई : जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान हे स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं असतं. सध्याच्या काळात अनेक जण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यासाठी खूप अभ्यास करतात. फक्त परीक्षाच नाही, तर सामान्य जीवनातही काही बेसिक प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत असायला पाहिजे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडतात; पण प्रत्येक सेकंदाला पृथ्वीवर किती वीज कोसळण्याच्या घडतात, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नासह इतरही काही मनोरंजक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
प्रश्न - पृथ्वी सर्वांत जास्त गरम कधी आणि कुठे झाली होती?
उत्तर - पृथ्वीवर आतापर्यंतचं सर्वांत जास्त तापमान 134 F (56.67 सेल्सिअस) होते. एवढ्या जास्त तापमानाची नोंद डेथ व्हॅली, नेवाडा या ठिकाणी जुलै 1913 मध्ये करण्यात आली होती.
प्रश्न - कोणत्या प्राण्याला फुफ्फुसं नसतात?
उत्तर- मुंग्यांना फुफ्फुसं नसतात. ते त्यांच्या शरीरावर असलेल्या लहान छिद्रांमधून श्वास घेतात ज्याला स्पायरॅकल्स म्हणतात.
advertisement
प्रश्न - कोणत्या सजीवाचे हृदयाचे ठोके तीन किलोमीटर अंतरावर ऐकू येतात?
उत्तर - ब्लू व्हेल हा एकमेव असा सजीव आहे, ज्याच्या हृदयाचे ठोके 3 किलोमीटर अंतरावरूनही ऐकू येतात असा दावा केला जातो.
प्रश्न - पाण्यानंतर जगात सर्वांत जास्त प्यायलं जाणारं पेय कोणतं आहे?
उत्तर - चहा हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय आहे, असं मानलं जातं.
advertisement
प्रश्न - टॉयलेट पेपरआधी कोणत्या गोष्टीचा वापर होत होता?
उत्तर - टॉयलेट पेपरच्या आधी मक्याच्या कणसाच्या सालींचा वापर केला जात असे.
प्रश्न - आतापर्यंतची समुद्राची सर्वांत मोठी लाट कधी आणि कुठे आली होती?
उत्तर - आतापर्यंतची समुद्राची सर्वांत मोठी लाट अलास्का इथल्या लिटुआ खाडीमध्ये आली होती. 1958मध्ये आलेल्या या लाटेची उंची 1,720 फूट होती.
advertisement
प्रश्न - पृथ्वीशिवाय इतर कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे?
उत्तर - पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही.
प्रश्न - पृथ्वीवर एका सेकंदात किती वेळा वीज कोसळते?
उत्तर - पृथ्वीवर एका सेकंदात सरासरी शंभर वेळा वीज कोसळते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 27, 2024 10:12 PM IST


