Indian Railway : ट्रेनमध्ये वापरले जाणारे डिस्पोजल धुवून पुन्हा वापरतात? रेल्वे कॅन्टीनच्या व्हिडिओने सगळ्यांची उडवली झोप
- Published by:Devika Shinde
Last Updated:
वापरलेलं डिस्पोजल धूवून दिलं जातं प्रवाशांना जेवण? रेल्वे कॅन्टीनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ, IRCTC चं यावर काय म्हणणं आहे वाचा.
मुंबई : भारतीय रेल्वे ही दररोज लाखो प्रवाशांचं प्रवासाचं प्रमुख साधन आहे. लाखो लोक याने प्रवास करतात कारण ती सगळ्यांच्या खिशाला परवडणारी आहे, शिवाय देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांना ही ट्रेन जोडते. म्हणजेच तुम्ही कुठूनही कुठेही प्रवास करु शकता. पण या प्रवासात मिळणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित होत असतात. असाच एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला आहे, त्याने रेल्वे प्रशासनालाची बोलती बंद केली आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं दिसतंय काय?
हा व्हिडिओ अमृत भारत एक्सप्रेस (16601) ट्रेनचा असल्याचं सांगितलं जातं. यात एक व्यक्ती रेल्वेमध्ये वापरले जाणारे डिस्पोजेबल फूड कंटेनर धुवून पुन्हा वापरताना दिसतो. हा व्हिडिओ काँग्रेस नेते श्रीनिवास बी. व्ही. यांनी शेअर करत रेल्वे मंत्र्यांवर टीका केली “प्रवाशांकडून पूर्ण भाडं आकारता, पण अशी लाजिरवाणी कृती? तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असं कॅप्शन त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं.
advertisement
या घटनेनंतर रेल्वेत दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या स्वच्छतेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे.
IRCTCची तत्काळ कारवाई
सुरुवातीला रेल्वे मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नव्हती. पण व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यावर IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) ने कारवाई केली. IRCTCने सांगितलं की, संबंधित वेंडरची ओळख पटवली आहे आणि त्याला तत्काळ सेवेतून हटवण्यात आलं आहे. त्याचा लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यावर मोठा दंडही ठोठावला गेला आहे.
advertisement
A shocking video has gone viral showing a catering staff member washing used disposable food containers in the passenger washbasin of the Erode-Jogbani Amrit Bharat Express (Train No. 16601), sparking widespread outrage and concerns over hygiene and food safety on Indian trains.… pic.twitter.com/zoKaW3BKON
— Daily Kishtwar Times (@kishtwartimes1) October 19, 2025
advertisement
प्रवाशांचा संताप आणि सोशल मीडियावरील चर्चा
व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप केला. काहींनी म्हटलं “रेल्वे पूर्ण भाडं घेतं पण स्वच्छतेबाबत बेफिकीर आहे.” तर दुसऱ्यांनी प्रश्न विचारला, “हे पहिल्यांदाच नाही, आपली मानसिकता बदलायला हवी.”
वाद वाढल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने या प्रकरणावर फॅक्ट चेक जारी केला. PIBने सांगितलं की हा व्हिडिओ भ्रामक आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे कंटेनर प्रवाशांना अन्न देण्यापूर्वी नव्हे, तर डिस्पोजलपूर्वी साफ केले जात होते. म्हणजेच ते पुन्हा वापरले जात नव्हते.
advertisement
तरीही, अनेक यूजर्सनी प्रश्न विचारला “जर हे कंटेनर वापरून झाल्यावर टाकायचे असतील, तर त्यांना धुण्याची गरजच काय?” या प्रश्नावरून अजूनही चर्चा सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 3:41 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Indian Railway : ट्रेनमध्ये वापरले जाणारे डिस्पोजल धुवून पुन्हा वापरतात? रेल्वे कॅन्टीनच्या व्हिडिओने सगळ्यांची उडवली झोप