नाताळ आणि थर्टीफस्टचं बिनधास्त करा प्लॅनिंग, मध्य रेल्वेकडून 76 स्पेशल गाड्यांची घोषणा

Last Updated:

नाताळ, नववर्ष आणि हिवाळी सुट्ट्यांदरम्यान वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या अतिरिक्त मागणीची प्रभावी पूर्तता करण्यासाठी हिवाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नाताळ–नववर्षासाठी मध्य रेल्वेकडून 76 हिवाळी विशेष गाड्यांची मोठी घोषणा
नाताळ–नववर्षासाठी मध्य रेल्वेकडून 76 हिवाळी विशेष गाड्यांची मोठी घोषणा
नाताळ, नववर्ष आणि हिवाळी सुट्ट्यांदरम्यान वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या अतिरिक्त मागणीची प्रभावी पूर्तता करण्यासाठी एकूण 76 हिवाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई–करमळी, नागपूर, मंगळुरू, तिरुवनंतपुरम तसेच पुणे–नागपूर, अमरावती आणि सांगानेर या लोकप्रिय मार्गांवर या विशेष सेवा उपलब्ध राहणार आहेत. उत्सवाच्या काळात प्रवास अधिक सुकर आणि गर्दी नियंत्रित राहावी यासाठी हा उपाय महत्त्वाचा ठरणार आहे.
पहिल्या सेवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–करमळी दैनिक विशेषच्या 36 फेऱ्यांचा समावेश आहे. 19 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत 01151 आणि 01152 या गाड्या दररोज धावणार असून दोन्ही दिशांनी सोयीस्कर वेळा ठेवण्यात आल्या आहेत. कोकणातील लोकप्रिय स्थानकांवर थांबे देण्यात आले असून वातानुकुलित आणि सामान्य श्रेणीच्या कोचेसह विस्तृत संरचना देण्यात आली आहे.
advertisement
दुसऱ्या सेवांमध्ये, लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम उत्तर साप्ताहिक विशेष गाडीचे 8 फेऱ्यांचा समावेश आहे. 18 डिसेंबर 2025 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत गुरुवारी सुटणारी 01171 आणि शनिवारी परतणारी 01172 ही गाडी कोकण–कर्नाटक–केरळ मार्गावरील महत्त्वाची स्थानके कव्हर करेल.
मंगळुरू जंक्शन मार्गावरील 8 विशेष सेवांसह 16 डिसेंबरपासून एलटीटी–मंगळुरू जंक्शन साप्ताहिक विशेष धावणार आहे. 01185 आणि 01186 ही साप्ताहिक विशेष गाडी असेन यात वातानुकुलित आणि पॅन्ट्रीसह विस्तारित संरचना देण्यात आली असून उत्सवात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या या मार्गाला अतिरिक्त दिलासा मिळणार आहे.
advertisement
सीएसएमटी–नागपूर, पुणे–नागपूर, पुणे–सांगानेर आणि पुणे–अमरावती या मार्गांसाठीही प्रत्येकी 6 विशेष सेवांची सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या गाड्या हिवाळी पर्यटन, कुटुंबभेटी आणि नाताळ–नववर्ष साजरा करण्यासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी सोय ठरणार आहेत.
या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण IRCTC संकेतस्थळावर तसेच सर्व आरक्षण केंद्रांवर सुरू असून UTS अॅपद्वारे अनारक्षित कोचची तिकिटे उपलब्ध आहेत. वेळापत्रक, थांबे आणि वास्तविक परिस्थितीतील बदल यांची ताजी माहिती NTES अॅपवर पाहता येईल.
advertisement
उत्सवाच्या काळात प्रवासी ताण कमी करून सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची हमी मिळावी यासाठी मध्य रेल्वेकडून केलेली ही विशेष सेवा प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
नाताळ आणि थर्टीफस्टचं बिनधास्त करा प्लॅनिंग, मध्य रेल्वेकडून 76 स्पेशल गाड्यांची घोषणा
Next Article
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement