जगन्नाथ मंदिरावरुन का उडत नाही एकही पक्षी किंवा विमान, गुढ गोष्टीबद्दल इतिहास आणि विज्ञान काय सांगतं?

Last Updated:

आता हे ऐकल्यावर एखाद्या चमत्कारासारखे वाटेल, जे आजही लाखो भक्तांसाठी आणि संशोधकांसाठी एक रंजक विषय बनून राहिले आहे.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : ओडिशातील पुरी शहरात असलेले श्री जगन्नाथ मंदिर हे फक्त चारधामपैकी एक असलेले मोठे धार्मिक स्थळ नाही, तर ते अनेक गूढ आणि आश्चर्यकारक घटनांचे केंद्र आहे. मंदिराशी जोडलेले अनेक रहस्य भाविक आणि विज्ञाननिष्ठ अशा दोघांनाही विचार करायला लावतात. यापैकीच एक मोठे आणि कायम चर्चेत राहणारं गुढ म्हणजे असं म्हणतात की त्या मंदिराच्या घुमटावून कधीही कोणता पक्षी किंवा विमान उडत नाही. आता हे ऐकल्यावर एखाद्या चमत्कारासारखे वाटेल, जे आजही लाखो भक्तांसाठी आणि संशोधकांसाठी एक रंजक विषय बनून राहिले आहे.
पण आता हे ऐकल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न उभे रहातील की असं का होतं, विमान का यामंदिरावरुन उडत नाही. पक्षी का उडत नाहीत वैगरे वैगरे..... याबद्दल भाविकांमध्ये आणि विज्ञानामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत.
भक्तांची श्रद्धा आणि दैवी शक्ती
गरुड देवाचे रक्षण: भक्तांच्या मते, भगवान जगन्नाथ हे साक्षात जगाचे स्वामी आहेत. त्यांचे वाहन आणि पक्ष्यांचे राजा असलेले गरुड देव नेहमीच मंदिराच्या रक्षणासाठी तैनात असतात.
advertisement
पवित्रतेचे पालन: गरुड देव पहारा देत असताना, इतर कोणताही पक्षी या परमपवित्र स्थानावरून उडण्याचे धाडस करत नाही. लोक याला भगवंताच्या दिव्य शक्तीचा आणि मंदिराच्या पवित्रतेचा पुरावा मानतात, जिथे निसर्गसुद्धा स्वतःहून भगवंताच्या मर्यादेचे पालन करतो.
विज्ञानाचा दृष्टिकोन
भौगोलिक स्थान आणि हवेचा प्रवाह: वैज्ञानिकांच्या मते, पुरी हे समुद्रकिनाऱ्याजवळ असल्यामुळे येथे वेगवान, अनियमित आणि उलटसुलट वाऱ्याचे झोत सतत वाहत असतात. मंदिराची रचना सुमारे 214 फूट उंच आणि शंक्वाकार (Cone-shaped) असलेली मंदिराची रचना या वेगाने येणाऱ्या वाऱ्याला अडवते.
advertisement
वाऱ्यामुळे मंदिराच्या उंच आणि सरळ आकृतीवर एक जटिल वायुप्रवाह (Complex Airflow) तयार होतो, ज्याला वैज्ञानिक भाषेत 'वोर्टेक्स' म्हणतात. या तीव्र आणि अनिश्चित वाऱ्यामध्ये पक्ष्यांना आपला तोल सांभाळणे अत्यंत कठीण होते. म्हणूनच, पक्षी मंदिराच्या अगदी वरून उडण्याऐवजी, त्याच्या आजूबाजूने उडून जातात.
नीलचक्र आणि धातूचे तेज
काही लोकांचे मत आहे की मंदिराच्या शिखरावर असलेले 'नीलचक्र' हे देखील पक्ष्यांना दूर ठेवण्यास कारणीभूत आहे.
advertisement
हे चक्र आठ धातूंनी बनलेले असून ते दुरून चमकताना दिसते. या तीव्र चकाकीमुळे किंवा इतर काही प्रभावामुळे पक्षी त्या उंचीवर जाणे टाळतात. मात्र, या अनुमानावर कोणतेही ठोस वैज्ञानिक संशोधन उपलब्ध नाही.
हवाई जहाजांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, पुरी शहर कोणत्याही मुख्य हवाई मार्गावर (Major Air Route) येत नाही. त्यामुळे विमानांना या भागातून जाण्याची गरजच पडत नाही. या मंदिरासाठी सरकारने कोणताही अधिकृत 'नो-फ्लाई झोन' (No-Fly Zone) जाहीर केलेला नाही; तरीही विमानांचा मार्ग इथून नसल्याने ते मंदिरावर दिसत नाहीत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
जगन्नाथ मंदिरावरुन का उडत नाही एकही पक्षी किंवा विमान, गुढ गोष्टीबद्दल इतिहास आणि विज्ञान काय सांगतं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement