PM House : अनेक वर्षांपासून रिकामं आहे पंतप्रधानांचं घर, पीएमही जायला घाबरतात, काय आहे तिथं?

Last Updated:

Japan PM House : पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान वर्षानुवर्षे रिकामं राहिलं. कोणत्याही पंतप्रधानांना त्यात राहायचं नव्हतं. एक वर्षापूर्वी पंतप्रधान तिथं राहायला गेले होते, पण...

News18
News18
टोकियो : पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर क्वचितच कोणीही व्यक्ती त्यांचं अधिकृत निवासस्थान सोडतं पण जपानमध्ये कोणताही पंतप्रधान पंतप्रधानांसाठी असलेल्या अधिकृत निवासस्थानात प्रवेश करण्याचं धाडस करू शकत नव्हता. सोरी कोटाई नावाच्या या अधिकृत पंतप्रधान निवासस्थानाबद्दल असं म्हटलं जातं की तिथं राहणाऱ्यांचं जीवन धोक्यात आहे.
जपानच्या पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान सोरी केताई, टोकियोमधील पंतप्रधान कार्यालयाशेजारी आहे. जपानचे पंतप्रधानांचे निवासस्थान आणि कार्यालय एकत्रितपणे चालवलं जातं. पंतप्रधानांचे निवासस्थान सचिवालय संपूर्ण घराचे व्यवस्थापन करतं, ज्यामध्ये देखभाल, सुरक्षा, आदरातिथ्य, स्वच्छता आणि कर्मचारी व्यवस्थापन यांचा समावेश आहे. राष्ट्रीय पोलिस एजन्सी आणि टोकियो मेट्रोपॉलिटन पोलिसांचे विशेष गार्ड युनिट येथे सुरक्षेसाठी तैनात आहे. परदेशी नेत्यांचं स्वागत, मेजवानी आणि पत्रकार परिषदांसाठी स्वतंत्र प्रोटोकॉल कर्मचारी आहेत.
advertisement
कसं आहे जपानी पंतप्रधानांचं निवासस्थान?
सुमारे 25 हजार चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे, ज्यामध्ये 6 इमारती आहेत, त्यापैकी एक पंतप्रधानांचे निवासस्थान म्हणून निवडण्यात आली होती. उर्वरित सर्व कार्यालये आणि व्हीआयपी पाहुण्यांच्या मुक्कामासाठी आहेत.
पंतप्रधानांच्या निवासस्थानात आणि कार्यालयात थेट काम करणारे कर्मचारी एकत्रितपणे सुमारे 200-250 आहेत. पंतप्रधानांशी संबंधित निवासस्थानातील कर्मचारी सुमारे 50-60 लोक असतात.
advertisement
इथं एक पूर्ण सुसज्ज स्वयंपाकघर आहे, जे अधिकृत मेजवानी आणि पंतप्रधानांच्या कुटुंबातील जेवणासाठी स्वतंत्रपणे काम करते. त्यात एक मुख्य स्वयंपाकी, 3-4 सहाय्यक स्वयंपाकी, काही पेस्ट्री/मिष्टान्न स्वयंपाकी, सर्व्हिंग कर्मचारी आणि वेटर असतात. एकूण, सुमारे 10-15 लोक स्वयंपाकघरात आणि फक्त सर्व्हिंगमध्ये गुंतलेले असतात. मोठ्या मेजवानी दरम्यान, बाह्य स्वयंपाकी आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना तात्पुरतं बोलावलं जातं.
advertisement
हे निवासस्थान पंतप्रधान कार्यालयाशी जोडलेलं आहे, पण ते आधुनिक सुरक्षा मानकांना पूर्णपणे पूर्ण करत नाही. अनेक जपानी पंतप्रधानांनी कबूल केलं आहे की कार्यालयाजवळ राहणं सुरक्षा आणि गोपनीयतेच्या दृष्टीने चांगलं नाही.
निवासस्थानापासून दूर राहणारे शिंजो आबे पहिले पंतप्रधान
शिंजो आबे हे निवासस्थानापासून दूर राहण्याचा निर्णय घेणारे पहिले पंतप्रधान बनले. शिंजो आबे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यात राहत होते, परंतु दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी तिथं जाण्यास नकार दिला. त्यांनी त्याऐवजी स्वतःच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला.त्यांनी म्हटलं की ही इमारत कथितपणे रहस्यमय शक्तींचं निवासस्थान आहे. जपानी पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर सोरी कोटाई इथं अलौकिक शक्तींचं वास्तव्य आहे अशा अफवांना खतपाणी घालण्यात आलं. पण जेव्हा अफवा वेगाने पसरल्या तेव्हा पंतप्रधानांच्या प्रतिनिधींनी अधिकृत निवेदन देऊन पंतप्रधान निवासस्थानात भूत राहण्याची कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं, पण या विधानानंतरही पंतप्रधान तिथे गेले नाहीत. इंडिपेंडेंटच्या एका वृत्तात याचा उल्लेख आहे.
advertisement
जपानी पंतप्रधान सहसा टोकियोमध्ये चांगल्या आणि सुरक्षित खाजगी घरांमध्ये राहतात.  शिंजो आबे, योशिहिदे सुगा आणि फुमियो किशिदा यांनी अधिकृत निवासस्थानात न राहण्याचा निर्णय घेतला.  शिंजो आबेंनंतर (2012-2020) योशिहिदे सुगा (2020-21) देखील तिथं राहत नव्हते. फुमियो किशिदा (2021-2023) देखील त्यांच्या खाजगी घरात राहत होते. अधिकृत निवासस्थान बहुतेक रिकामंच राहिलं. 2012 ते 2021 पर्यंत अधिकृत निवासस्थान पूर्णपणे रिकामं राहिले.
advertisement
माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनीही अधिकृत पंतप्रधान निवासस्थानाऐवजी स्वतःच्या घरात राहणं पसंत केलं. पंतप्रधानपदाची शपथ घेऊन जवळजवळ 6 महिने झाले तरी ते टोकियोमधील कथित झपाटलेल्या घरात गेले नाहीत. योशिहिको नोडा हे 2011-12 या वर्षात सोरी कोटाई येथे राहणारे शेवटचे पंतप्रधान होते.
advertisement
2023 मध्ये एका संशयिताने पंतप्रधान किशिदा यांच्यावर हल्ला करताना स्फोटकं फेकली तेव्हा सुरक्षा संस्थांनी त्यांना अधिकृत निवासस्थानात जाण्याचा सल्ला दिला. आता ते बहुतेक तिथंच राहतात. पण या निवासस्थानाचा हंटेड टॅग अजूनही जपानी मीडिया आणि पॉप संस्कृतीमध्ये चर्चेचा विषय आहे.
देखभालीवर दरवर्षी 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च
जोपर्यंत ते रिकामं होतं तोपर्यंत त्याची संपूर्ण देखभाल चालू राहिली आणि दरवर्षी त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात होते. दरवर्षी इमारतीची स्वच्छता आणि बागेची देखभाल करण्यासाठी सुमारे 1.1 दशलक्ष पौंड म्हणजे 10 कोटी 32 लाख खर्च केले जातात. यासाठी कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. अशा परिस्थितीत, विरोधी पक्ष सतत विद्यमान पंतप्रधानांवर तिथं जाऊन राहण्यासाठी दबाव आणत आहेत.
काय आहे या निवासस्थानात?
1930 च्या दशकात इथं दोन मोठ्या घटना घडल्या. 1932 मध्ये पंतप्रधान इनुकाई त्सुयोशी यांची इथं हत्या करण्यात आली आणि 1936 मध्ये बंडखोर सैनिकांनी त्यावर हल्ला केला. यामध्ये तत्कालीन पंतप्रधान केसुके ओकाडा यांच्या मेहुण्यासह 4 जणांचा मृत्यू झाला.
यानंतर असं मानलं जाऊ लागलं की घरात राहणं सुरक्षित नाही, मृतांचे आत्मे इथं फिरत असतात. अनेक वेळा लष्करी जवानांच्या मार्चिंगचा आवाज देखील इतं ऐकू येतो. या घटनांनंतर ते  हंटेड ठिकाण मानलं गेलं आणि जपानी नेत्यांमध्ये एक प्रकारची मानसिक भीती निर्माण झाली.
हे घर रहस्यमय आणि झपाटलेलं आहे म्हणून 2001 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जुनिचिरो कोइझुमी यांनी पंतप्रधान निवासस्थानात काही भूतविद्या केली होती. ही भूतविद्या अशा प्रकारे करण्यात आली होती की रहस्यमय शक्तींना घरातून हाकलून लावता येईल.
दुसरीकडे, असंही म्हटलं जातं की हे पीएम हाऊस जपानमधील सामान्य घरांपेक्षा खूप मोठं असल्याने पंतप्रधान इथं राहू इच्छित नाहीत. आम्ही तुम्हाला सांगतो की जपानमध्ये कॉम्पॅक्ट हाऊसचा ट्रेंड आहे, ज्यामध्ये लहान घरे असतात आणि कमीत कमी वस्तू ठेवल्या जातात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
PM House : अनेक वर्षांपासून रिकामं आहे पंतप्रधानांचं घर, पीएमही जायला घाबरतात, काय आहे तिथं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement