बापरे! मानेजवळ पाणी येईपर्यंत Live Reporting, पुरात वाहून गेला जर्नालिस्ट, अंगावर काटा आणणारा VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
पत्रकार त्याच्या मानेपर्यंत पाण्यात उभा होता आणि त्याच अवस्थेत लाईव्ह कव्हरेज करत होता, तेव्हा अचानक पाण्याचा जोर इतका वाढला की तो स्वतः प्रवाहाचा बळी ठरला.
कराची : पाकिस्तानमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. पुरामुळे संपूर्ण देश हादरला आहे. अशात सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पुराचं लाइव्ह रिपोर्टिंग करताना एक पत्रकार चक्क पुरात वाहून गेला आहे. कर्तव्य निभावताना असं धाडस करणं पत्रकाराच्या अंगाशी आलं आहे.
रावळपिंडीतील चाहन धरणाजवळ पुराचं रिपोर्टिंग करणारा हा पत्रकार. तिथल्या पुराची माहिती देत होता. पूरग्रस्तांची अवस्था काय आहे, त्यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे, पुरामुळे त्यांना कोणता धोका पत्करावा लागत आहे, हे स्वत: पुरात उतरून दाखवणारा हा पत्रकार. पूर परिसरात पूरग्रस्तांची अवस्था मांडताना त्याने स्वत:चा जीव धोक्यात घातला. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पुरात हा पत्रकार उभा आहे. मानेपर्यंत पाणी आणि एका हातात माइक. माइक असलेला हात त्याने कसाबसा पाण्यातून बाहेर काढला आहे आणि एक हात कुठेतरी धरून त्याने स्वतःला सावरलेलं आहे. पाणी हळूहळू वाढत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पाण्याचा प्रवाह किती आहे हे दाखवण्यासाठी तो मधेच आपला एक हात सोडतो. तेव्हा तो पाण्यात वाहून जाताना दिसतो.
advertisement
शेवटी या पत्रकाराचं काय झालं ते मात्र या व्हिडीओत दाखवण्यात आलेलं नाही. पण व्हिडीओ प्रत्येकाला धडकी भरवणारा असाच आहे. हा व्हिडिओ अल अरेबिया इंग्लिशने त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.
A Pakistani reporter is swept away by strong currents during a live broadcast while covering the floods in neck-deep water.#Pakistan #Floods pic.twitter.com/0raCbYaoer
— Al Arabiya English (@AlArabiya_Eng) July 17, 2025
advertisement
या दृश्याने सोशल मीडियावरील युझर्सना धक्का बसला आहे. अनेकांनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं आहे तर काहींनी त्याचा जीव धोक्यात घालण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
26 जूनपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत. या आपत्तीमुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत, शेकडो घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधा ठप्प झाल्या आहेत. अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत आणि मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
July 18, 2025 2:00 PM IST
मराठी बातम्या/Viral/
बापरे! मानेजवळ पाणी येईपर्यंत Live Reporting, पुरात वाहून गेला जर्नालिस्ट, अंगावर काटा आणणारा VIDEO


