Jugaad Video : प्रवास करताना नेहमी सोबत ठेवा बटाटा, पावसाळ्यात फायद्याचा

Last Updated:

Viral Potato Jugaad Video : बटाट्यापासून बरेच पदार्थ बनवले जातात. बटाट्याचा घरगुती सौंदर्य उपाय म्हणूनही वापर केला असेल. प्रवासात बटाट्याचे चिप्स खाल्ले असतील पण प्रवासात अख्खा बटाटा कधी नेऊन पाहिला आहे का?

News18
News18
मुंबई : पावसाळ्यात तुम्ही गरमागरम बटाटा भजी खात असाल पण याच बटाट्याचा पावसात आणखी एक अनोखा असा वापर. तुम्ही विचारही केला नसेल पावसात बटाटा जीव वाचवण्याचं काम करतो. बटाट्याचा असा वापर आणि फायदा तुम्हाला माहितीच नसेल. या किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
बटाट्यापासून बरेच पदार्थ बनवले जातात. बटाट्याचा घरगुती सौंदर्य उपाय म्हणूनही वापर केला असेल. प्रवासात बटाट्याचे चिप्स खाल्ले असतील पण प्रवासात अख्खा बटाटा कधी नेऊन पाहिला आहे का? प्रवासात तुमच्यासोबत एक तरी बटाटा नक्की ठेवा. यामुळे किती तरी जीव वाचतील. आता बटाटा कसा काय जीव वाचवेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
पावसाळ्यात गाड्या चालवताना तुम्ही पाहिलं असेल गाड्यांच्या काचा आणि आरशांवर पाणी लागतं. त्यामुळे इतर गाड्या स्पष्ट नीट दिसत नाहीत. अशावेळी अपघात होण्याचा आणि जीव जाण्याचा धोका आहे. पण इथं साधा बटाटा तुमच्या फायद्याचा (Viral Potato Jugaad Video) ठरेल.
advertisement
तुम्ही एक बटाटा घ्या तो मधून कापा. आता कापलेला बटाटा पावसाचं पाणी पडलेल्या आरशावर फिरवा. आरशावरील पाणी स्वच्छ होईल आणि पुन्हा त्यावर अशा पद्धतीने पाणी राहणारच नाही. यामुळे तुम्हाला तुमच्या गाडीच्या मागून येणाऱ्या गाड्या स्पष्ट दिसतील. ज्यामुळे अपघात होणार नाही आणि साहजिकच जीवही वाचेल, असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Carki Kaksha (@carki.kaksha)



advertisement
@carki.kaksha इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तुम्ही असे कोणते जुगाड करता त्याबाबतही आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये माहिती नक्की द्या.
advertisement
(सूचना – हा लेख व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/Viral/
Jugaad Video : प्रवास करताना नेहमी सोबत ठेवा बटाटा, पावसाळ्यात फायद्याचा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement