Kitchen Jugaad Video :  स्वयंपाक झाल्यावर गॅसवर मीठ टाकायला विसरू नका, चमत्कारिक फायदा

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : खाद्यपदार्थांप्रमाणेच गॅसवरही मीठ टाकायला हवं. गॅसवर मीठ टाकण्याचा मोठा किंबहुना चमत्कारिक फायदा आहे, असं म्हणायला हरकत नाही.

News18
News18
नवी दिल्ली : मीठ ज्याच्याशिवाय कोणताही पदार्थ बेचव लागतो. त्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये आपण मीठ टाकतो. पण मिठाचा आणखी एक अनोखा असा वापर तुम्हाला माहिती नसेल. आता गॅसवर मीठ टाकल्याने काय होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विचित्र पण जबरदस्त असा हा किचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे.
खाद्यपदार्थांप्रमाणेच गॅसवरही मीठ टाकायला हवं. गॅसवर मीठ टाकण्याचा मोठा किंबहुना चमत्कारिक फायदा आहे, असं म्हणायला हरकत नाही. गॅसवर मीठ टाकताच काय परिणाम होतो, याचा व्हिडीओ युट्युबवर पोस्ट करण्यात आला आहे.
एका भांड्यात गॅसचे बर्नर घ्या. त्यावर मीठ, शॅम्पू, बेकिंग सोडा टाका. बेकिंग सोडाऐवजी बेकिंग पावडर वापरू नका. व्हिनेगर टाका, व्हिनेगर नसेल तर लिंबूरस वापरू शकता पण शक्यतो व्हिनेगर टाका, याचा परिणाम चांगला दिसेल. जुन्या टूथब्रशच्या मदतीने हे मिश्रण बर्नरला नीट चोळून घ्या आणि थोड्या वेळाने बाजूला ठेवा.
advertisement
आता गॅस शेगडीकडे जा. एका भांड्यात गरम पाणी घ्या, त्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाका. व्हिनेगरऐवजी लिंबू रस वापरू शकता. डिशवॉश लिक्विड असेल तर ते नाहीतर वॉशिंग पावडर टाका. सुती कपड्याने गॅस शेगडी, किचन स्वच्छ पुसून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही दररोज गॅस स्वच्छ करू शकता.
advertisement
गॅस धुण्याऐवजी तुम्ही असा स्वच्छ करू शकता. गॅस दररोज धुतल्याने गॅसखाली पाइप असतात ते खराब होतात, लीकही होऊ शकतात. त्यामुळे शेगडीही जास्त काळ टिकणार नाही. महिना-दोन महिन्याने एकदा गॅस धुवा मात्र दररोज स्वच्छ करायचा तर अशा पद्धतीने पुसून स्वच्छ करा. अगदी धुतल्याप्रमाणे हा गॅस ओटा, चमकेल.
गॅस स्वच्छ झाल्यानंतर आता भिजत ठेवलेल्या बर्नरकडे वळू. जुना टूथब्रथ किंवा घासणीने घासून घ्या. बर्नरच्या छिद्रात टूथपिक घालून घ्या. पाण्याने स्वच्छ करून घ्या. स्वच्छ कपड्याने पुसून नीट सुकवून मगच गॅसवर लावून ऑन करा. बर्नरचे होल बंद होतात, अशा पद्धतने सवच्छ केल्याने हे छिद्र खुले होतात आणि गॅस नीट लागतो, वाया जात नाही.
advertisement
Prajakta salve युट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून घ्या आणि याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. कोणत्याही नुकसानीसाठी न्यूज18मराठी जबाबदार नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video :  स्वयंपाक झाल्यावर गॅसवर मीठ टाकायला विसरू नका, चमत्कारिक फायदा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement