Kitchen Jugaad Video : शेगडीला लावा फक्त टिकली, गॅस लवकर संपणार नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kichen Tips In Marathi : छोटीशी टिकली तुमच्या गॅसची बचत करू शकते, असा विचार तरी तुम्ही केला होता का? पण या गृहिणीने ते करून दाखवलं आहे.
सरनवी दिल्ली : जास्तीत जास्त दिवस गॅस पुरावा यासाठी कित्येक गृहिणींची धडपड असते. असाच एक गॅसची बचत करणाराकिचन जुगाडजो एका गृहिणीने दाखवला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गृहिणीने चक्क टिकली लावून गॅसची बचत करण्याचा उपाय दाखवला आहे. आता ते कसं ते पाहुयात.
टिकली जी आपण कपाळाला लावतो. पण याच टिकलीचा अनोखा असा वापर. ही छोटीशी टिकली तुमच्या गॅसची बचत करू शकते, असा विचार तरी तुम्ही केला होता का? पण या गृहिणीने ते करून दाखवलं आहे. तुम्हाला करायचं काय आहे तर फक्त गॅसच्या बर्नरवर तुम्हाला टिकली लावायची आहे आणि गॅस पेटवून ती थोडी जळली की काढायची आहे. आता यामुळे गॅस बचत कशी काय होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
तुम्ही पाहिलं असेल की काही वेळा गॅसच्या बर्नरमधून लाल रंगाची फ्लेम येते. याचा अर्थ गॅस बर्नर खराब झाला आहे. यामुळे गॅसवर ठेवलेली भांडी काळी होतात आणि गॅससुद्धा वाया जातो. त्यामुळे जिथं लाल फ्लेम पेटते तिथंच टिकली लावायची आहे. गॅस सुरू करायचा आहे. टिकली हळूहळू जळते. यामुळे टिकलीचा गम सुटतो. हा गमच ही कमाल करतो. यामुळे बर्नरच्या आतील भाग क्लिलर होतो आणि गॅसची फ्लेम लाल पेटणं बंद होतंं, असा दावा या महिलेनं केला आहे. साहजिकच यामुळे गॅस कमी वाया जातो आणि गॅसची बचत होते.
advertisement
Indian Vlogger Pinki युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
Delhi
First Published :
June 20, 2025 2:43 PM IST