advertisement

Kitchen Jugaad Video : कांदा वापरा पण पेपरचे तुकडे टाकूनच, पावसात मोठा फायदा

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : पावसाळा म्हटलं की बऱ्याच समस्या असतात. त्यापैकीच एक समस्या कांद्यात पेपर टाकल्याने दूर होईल. आता तुम्ही म्हणाल अशी कोणती समस्या आहे. नेमका हा जुगाड काय आहे?

News18
News18
नवी दिल्ली : पावसाळा म्हटलं की गरमागरम कांदाभजी आलीच. पावसात गरमगरम चहा पित गरमगरम भजी काण्याची मजा काही औरच. पावसात कांदाभजी बनवा किंवा आणखी काही. पण या कालावधीत कांदा वापरण्याआधी त्यात पेपरचे तुकडे नक्की टाका. याचा मोठा फायदा आहेप्रत्येक गृहिणीने हा किचन जुगाड करायला हवा. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
पावसाळा म्हटलं की बऱ्याच समस्या असतात. त्यापैकीच एक समस्या कांद्यात पेपर टाकल्याने दूर होईल. आता तुम्ही म्हणाल अशी कोणती समस्या आहे. त्याआधी नेमकं करायचं काय ते जाणून घेऊयात.
सामान्यपणे आपण कांदा बास्केट किंवा ट्रॉलीत ठेवतो. तुम्ही जिथं कांदा स्टोअर करता तिथं तो डायरेक्ट ठेवू नका. बास्केट किंवा ट्रॉलीत आधी न्यूजपेपर टाका आणि मग त्यावर कांदे ठेवा. आता या कांद्यात पेपरचे तुकडे किंवा गोळे करून टाका.
advertisement
याचा फायदा काय?
पावसाळ्यातील समस्यांपैकी एक समस्या म्हणजे कांदे खराब होण्याची. पावसात ओलावा असतो. त्यात कांदे ओलसर असतील तर ते लवकर खराब होतात. पण जर यात तुम्ही पेपर टाकला तर मात्र ही समस्या उद्भवणार नाही. कांद्याच्या खाली न्यूजपेपर असल्याने ओलावा शोषून घेतला जाईल. शिवाय कांद्याच्या मध्ये पेपरचे गोळे असल्याने मधील ओलावाही शोषला जाईल.
advertisement
simply marathi युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
पावसात कांदे साठवण्याची आणखी काही टिप्स
ओलाव्यापासून कांदे सुरक्षित ठेवा : कांदे साठवण्याची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी असेल याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तिथे कोणत्याही प्रकारचा ओलावा किंवा पाणी नसेल याची खात्री करा. थोडासा ओलावा किंवा पाण्यामुळे कांदे खराब होऊ शकतात आणि त्यामुळे दुर्गंधी येऊ शकते.
advertisement
कांदे बॅगमध्ये ठेवू नये : कांद्याला दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना योग्य हवा आणि प्रकाश मिळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कांदे साठवताना ते पिशवीमध्ये ठेवू नयेत. कांदे नेहमी उघड्यावर किंवा उघड्या बास्केटमध्ये ठेवा. यामुळे त्यांना हवा लागेल आणि ते खराब होणार नाहीत.
advertisement
न चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवू नका : अख्खे कांदे कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. कारण, न चिरलेला अखखा कांदा फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याला मोड येण्याची शक्यात असते. फ्रीजमधील ओलाव्यामुळे कांदे खराब देखील होऊ शकतात.
कोरडे कांदे खरेदी करा : जर तुम्ही कांदे खरेदी करत असाल तर नेहमी कोरडे आणि चांगले सुकलेले कांदे खरेदी करा. त्याचं बाह्यआवरण अजिबात ओलसर नसावं. मोड आलेले कांदे कधीही खरेदी करू नका. ते लवकर कुजतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : कांदा वापरा पण पेपरचे तुकडे टाकूनच, पावसात मोठा फायदा
Next Article
advertisement
BMC Mayor : मुंबई महापौरपदाच्या निवडीत ट्विस्ट, भाजपनं सगळा गेम फिरवला, ठाकरेंना पुन्हा धोबीपछाड
मुंबई महापौरपदाच्या निवडीत ट्विस्ट, भाजपनं सगळा गेम फिरवला, ठाकरेंना पुन्हा धोबी
  • मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आला आहे.

  • काठावरचं बहुमत असलेल्या महायुती सरकारनं मोठा डाव टाकला आहे.

  • या डावामुळे ठाकरे गटाच्या रणनीतीवर थेट आघात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

View All
advertisement