advertisement

Kitchen Jugaad Video : पावसाळ्यात दररोज संध्याकाळी लिंबाचा एक दिवा लावा, दिसेल 'चमत्कार'

Last Updated:

Kitchen Tips in Marathi : उन्हाळ्यात लिंबाचा वापर तुम्ही बराच केला असेल. लिंबूपाणी, लिंबाचं लोणचं आणि बरंच काही. पण पावसाळ्यातही लिंबाचा मोठा फायदा आहे. पावसाळ्यात लिंबाचा अनोखा असा वापर. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तो म्हणजे लिंबाचा दिवा.

News18
News18
नवी दिल्ली : लिंबाचा वापर तुम्ही बर्‍याच पद्धतीने करता. लिंबू सरबत बनवता, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये लिंबाचा रस टाकता. केसांसाठीही लिंबाचा वापर करता. याच लिंबाचा आणखी एक अनोखा असा वापर. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तो म्हणजे लिंबाचा दिवा.
बरेच लोक आहेत जे संध्याकाळी दरवाजात दिवा लावतात. पावसाळ्यात या साध्या दिव्यासोबत तुम्ही लिंबाचा दिवाही लावा. पावसाळ्यात लिंबाचा दिवा लावण्याचा खूप मोठा फायदा आहे. एक नाही तर 4-4 समस्यांतून तुमची सुटका होईल. त्या नेमक्या कोणत्या त्या पाहण्याआधी लिंबाचा दिवा बनवायचा कसा ते पाहूयात.
advertisement
कसा बनवायचा लिंबाचा दिवा?
एक लिंबू घेऊन त्याचा वरील थोडा भाग कापून घ्या. आता लिंबाच्या आतील रस गर काढून टाका. गर काढताना लिंबाला चीर पडणार नाही याची काळजी घ्या.
आता 3-4 लवंग, थोडं कापूर घेऊन त्याची पूड करा. ही पूड लिंबात टाका. त्यात कडुनिंबाचं तेल टाका. कडुनिंबाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेलही वापरू शकता. आता यात कापसाची फूल वात ठेवा. त्याच्या बाजूने पुन्हा थोडं तेल टाका. हा दिवा पणतीमध्ये ठेवा.
advertisement
लिंबाच्या दिव्याचा फायदा काय?
पावसाळ्यात डास, माश्या, चिलटे यांचा त्रास खूप होतो. शिवाय कुबट असा वास येतो. लिंबाचा हा दिवा या सर्व समस्यांपासून मुक्ती देईल, असा दावा या व्हिडिओ मध्ये करण्यात आला आहे.
advertisement
Simply marathi यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : पावसाळ्यात दररोज संध्याकाळी लिंबाचा एक दिवा लावा, दिसेल 'चमत्कार'
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement