advertisement

Kitchen Jugaad Video - बाटलीचं एक छोटंसं झाकण क्लिन ठेवेल तुमचं टॉयलेट; वारंवार स्वच्छ करण्याची झंझटच नाही

Last Updated:

बाटलीच्या एका छोट्याशा झाकणाचा टॉयलेट स्वच्छ करण्यात कसा वापर करायचा हे एका गृहिणीने दाखवलं आहे.

किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 05 सप्टेंबर : टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टॉयलेट क्लिनर, ब्लीचिंग पावडर किंवा आणखी काही वापरत असाल. पण तुम्ही कधी बाटलीच्या झाकणाने टॉयलेट क्लिन केलं आहे का? हो बाटलीच्या झाकणानेही टॉयलेट क्लिन करता येतं. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
एक भांडं घ्या. त्यात बेकिंग सोडा, मीठ, डिटर्जंट पावडर प्रत्येकी एक चमचा टाका. यात चमचाभर टूथपेस्ट टाकून अर्धा लिंबू पिळून घ्या. आता हे सर्व एकत्र करा. याची एक पेस्ट तयार होईल. मिश्रण थोडं हातात घेऊन हातांनी दाबून त्याचे गोळे होतात का ते पाहा.
आता बाटलीचं झाकण घ्या. त्यात हे मिश्रण भरा आणि बाहेर काढा. बाटलीच्या झाकणाच्या आकाराच्या गोळ्या तयार करून घ्या. एक गोळी या झाकणातच ठेवा. एक प्लॅस्टिक पिशवी घेऊन त्याचा छोटा भाग कापून तो या झाकणावर गुंडाळा. मिश्रण असलेल्या भागाकडून कात्रीने 3-4 छेद करून घ्या.
advertisement
आता याला एक दोरी बांधा आणि हे झाकण टॉयलेट फ्लश टॅन्कमध्ये टाका. अर्धी दोरी बाहेर ठेवा.
ही तुमची होममेड टॉयलेट क्लिनर टॅबलेट तयार झाली. जेव्हा तुम्ही फ्लश कराल तेव्हा झाकणातील थोडं मिश्रण बाहेर पाण्यात येईल आणि तुमचं टॉयलेट स्वच्छ होईल.
advertisement
महिलेने सांगितल्यानुसार एक गोळी 15 दिवस चालेल. ती संपली की याच झाकणात बनवून ठेवलेली दुसरी गोळी टाका. तुम्हाला टॉयलेट दररोज स्वच्छ करण्याची गरज पडणार नाही.
Puneri tadka युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - बाटलीचं एक छोटंसं झाकण क्लिन ठेवेल तुमचं टॉयलेट; वारंवार स्वच्छ करण्याची झंझटच नाही
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement