advertisement

Kitchen Jugaad Video - मिक्सरमध्ये काहीही वाटल्यानंतर एकदा कंगवा फिरवून पाहा; होतो असा फायदा

Last Updated:

मिक्सर वापरल्यावर हा उपाय एकदा जरूर करून पाहा.

किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : चटणी, वाटण, मसाला अशा कित्येक पदार्थांसाठी मिक्सरचा वापर होतो. मिक्सरमध्ये हे पदार्थ वाटले जातात. मिक्सरचं काम झालं की आपण लगेच तो ठेवून देतो. पण मिक्सरमध्ये काहीही वाटून झाल्यावर एक काम जरूर करा. या मिक्सरमधून तुम्ही कंगवा विसरायला फिरवू नका. मिक्सरमध्ये कंगवा लावताच अशी कमाल होते, की तुम्ही विचारही केला नसेल. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.
कंगवा आपण केस विंचरण्यासाठी वापरतो. याशिवाय कंगव्याचा दुसरा वापर नाही. पण याच कंगव्याचा अनोखा असा वापर एका गृहिणीने करून दाखवला आहे. जो तुम्ही एकदा पाहाल तर परत परत कराल. आता तो काय आणि कसा ते पाहूयात.
advertisement
गृहिणीने व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मिक्सर घ्यायचा आहे. त्याच्या वरच्या भागात जिथे आपण भांडं लावतो तिथं थोडं पाणी ओतायचं आहे. आता एक कंगवा घेऊन त्याच्या एका टोकाला एक छोटं कापड गुंडाळायचं आहे. आत कंगव्याचा कापड गुंडाळलेला भाग मिक्सरमध्ये पाणी टाकलेल्या भागात टाकून हातांनी फिरवून घ्या.
याचा फायदा काय? तर तुम्ही पाहिलं असेल मिक्सर वारंवार वापरल्याने या भागात घाण साचते. जी फक्त कपड्याने काढणं शक्य होत नाही. पण तुम्ही ती अशा पद्धतीने स्वच्छ केली तर ती लगेच स्वच्छ होईल.
advertisement
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - मिक्सरमध्ये काहीही वाटल्यानंतर एकदा कंगवा फिरवून पाहा; होतो असा फायदा
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement