advertisement

Kitchen Jugaad Video - सुरी-विळी-चॉपरशिवाय झटपट कांदे कापण्याची सोपी ट्रिक; डोळ्यात पाणीही येणार नाही

Last Updated:

कांदे कापण्याची एकदम सोपी अशी पद्धत एका गृहिणीने दाखवली आहे.

किचन जुगाड
किचन जुगाड
नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : स्वयंपाक करताना सर्वात किचकट आणि वैताग येईल असं काम कोणतं असेल तर ते कांदा चिरणं. खूप स्वयंपाक करायचा असेल तर त्यासाठी भरपूर कांदे लागतात आणि मग कांदे कापता कापता डोळ्यातून पाणीही येतं. पण आता तुम्ही सुरी, विळी, चॉपर याशिवायच कांदे कापू शकता. तेसुद्धा झटपट आणि डोळ्यात पाणी न येता. कांदे कापण्याची सोपी अशी ट्रिक एका गृहिणीने दाखवली आहे. या किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
कांदे कापण्याची अशी ट्रिक जी आजवर तुम्हाला कोणी कधीच दाखवली नसेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कांदे कापणंही तुम्हाला आवडू लागेल. कांदे कापणंही इतकं सोपं असेल याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. पण सुरी, विळी, चॉपरशिवाय कांदे कापायचे कसे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मग हा व्हिडीओ पाहा.
advertisement
सामन्यपणे स्वयंपाकासाठी आपण 2 पद्धतीने कांदे कापतो. एक म्हणजे उभ्या स्लाइस, ज्या आपण वाटणात वापरतो आणि दुसरा म्हणजे बारीक ज्या आपण फोडणीसाठी वापरतो.
आता उभ्या स्लाइससाठी कांदा कांद्याची साल सोलून घ्या आणि तो मधून कापा. दोन भाग केल्यानंतर एक भाग घ्या.
व्हिडिओ त दाखवल्यानुसार किसणी तुम्हाला लागेल. ज्यावर चकत्या करण्यासाठीही ब्लेड असतो. या ब्लेडवर तुम्हाला अर्धा कांदा घासायचा आहे. तुम्ही पाहाल तर एरवी चिरता तसेच किंबहुना त्यापेक्षाही पाताळ असे स्लाइस होतात.
advertisement
आता बारीक कांदा चिरण्यासाठी कांद्याची साल काढून त्यावर चौकोनी आकारात चिर द्या आणि मग तो कांदा किसणीच्या ब्लेडवर किसा. बारीक कांदा झटपट चिरून होईल.
भरपूर कांदे कापायचे असतील तेव्हा ही ट्रिक नक्कीच कामी येईल. यामुळे कांदे चिरताना डोळ्यातून पाणीही येणार नाही असा दावा या गृहिणीने केला आहे.
advertisement
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - सुरी-विळी-चॉपरशिवाय झटपट कांदे कापण्याची सोपी ट्रिक; डोळ्यात पाणीही येणार नाही
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement