advertisement

Kitchen Jugaad Video - दागिन्यांइतकीच जपून ठेवा ज्वेलरी पर्स; तुम्हाला माहिती नसेल असा वापर

Last Updated:

दागिन्यांच्या पाकिटांचा एक नाही तरी कितीतरी वापर आहेत.

किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : दागिने खरेदी केले की ते ठेवण्यासाठी ज्वेलर्स एक पाकिट देतात. एकदम मुलायम असलेलं हे पाकीट ज्यात दागिने सुरक्षित राहतात. पण ही पाकिटं खराब झाली की ती आपण फेकून देतो. पण खरंतर दागिन्यांची ही जुनी पाकिटंही दागिन्यांइतकीच सांभाळून ठेवायला हवीत. या ज्वेलरी पर्सचे अनेक वापर आहेत. एका गृहिणीने या किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्यांचा पुनर्वापर करता येतो. टाकाऊपासून टिकाऊ बनवता येतं. गृहिणी असा काही ना काही जुगाड करतात. असाच एका गृहिणीने केलेला हा ज्वेलरी पॅकेटचा जुगाड.
ज्वेलरी पॅकेटमध्ये दागिने ठेवण्या शिवाय काही महिला त्याचा आणखी एका गोष्टीसाठी वापर करतात ते म्हणजे पैसे ठेवणं. याशिवाय या पाकिटाचे आणखी बरेच वापर आहेत.
advertisement
एक म्हणजे तुम्ही एखाद्या डब्यात सर्व पॅकेट उभे लावून ठेवा. हा तुमचा एक ऑर्गनायझर तयार झाला. यात तुम्ही छोट्या छोट्या वस्तू ठेवू शकता. दुसरं म्हणजे एक कापड आयताकृती लांब कापून घ्या त्यावर एका विशिष्ट अंतरात ही पाकिटं शिवून घ्या. यातही तुम्ही बर्‍याच वस्तू ठेवू शकता. प्रवासाला जाताना यात वस्तू ठेवून तुम्ही हे गुंडाळून घेऊन जाऊ शकता.
advertisement
Madhuris creative world युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - दागिन्यांइतकीच जपून ठेवा ज्वेलरी पर्स; तुम्हाला माहिती नसेल असा वापर
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement