Kitchen Jugaad Video : किचन सिंकमध्ये एक चमचा तांदळाची कमाल; परिणाम पाहून चकीत व्हाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
तांदळाचा वापर तुम्ही सिंकमध्ये करू शकता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : तुम्ही तांदळापासून आजवर बरेच पदार्थ बनवले असतील. भात, पुलाव, बिर्याणी, घावणं, डोसे, इटली आणि काय काय... याव्यतिरिक्त पूजा, लग्न समारंभात अक्षता म्हणूनही तांदळाचा वापर केला जातो. तुम्ही घरगुती सौंदर्य उपायांमध्येही तांदूळ वापरला असेल. पण याशिवाय तांदळाचा आणखी एक अनोखा असा वापर जो तुम्हाला माहिती नसेल. तांदळाचा वापर तुम्ही सिंकमध्ये करू शकता. या किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
कित्येक गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा किचन सिंक आणि तांदळाचा जुगाड. याचा मोठा फायदा आहे. या उपायाचा परिणाम असा की पाहूनच तुम्ही थक्क व्हाल.
advertisement
यासाठी तुम्हाला फक्त एक छोटा चमचा तांदळाची गरज आहे. एक चमचा तांदूळ घ्या आणि तो किचन सिंकमध्ये पसरवा. यानंतर स्क्रब घ्या आणि त्याच्या मदतीने किचन सिंकमध्ये पसरवलेले तांदूळ सिंकमध्ये घासा. आता यावर पाणी टाकून स्वच्छ करून घ्या. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर किचन सिंक आधी खूप खराब दिसत होता. पण जसं तांदळाने तो घासला तसा तो चमकू लागला.
advertisement
किचन सिंकमध्ये आपण काही ना काही टाकत असतो. विशेषतः तेलकट पाणी वगैरे. यामुळे सिंक चिकट, अस्वच्छ होतं. त्यावर डागही पडतात. सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साबण किंवा डिटर्जंट किंवा एखादं लिक्विड वापरत असाल. पण ते वापरूनही किचन सिंक साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ते सहजासहजी स्वच्छ होत नाही. पण फक्त एक चमचा तांदूळ वापरून सिंक साफ केल्याने ते अगदी काही मिनिटांतच, फार मेहनत न घेता स्वच्छ झालं आहे.
advertisement
TeasteofHome युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
Delhi
First Published :
Aug 28, 2023 2:31 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : किचन सिंकमध्ये एक चमचा तांदळाची कमाल; परिणाम पाहून चकीत व्हाल










