प्रेम की व्यवहार? भारतातही वाढतोय ‘शुगर डॅडी’चा ट्रेंड, सोशल मीडियावर का होतीय तुफान चर्चा?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
‘शुगर डॅडी’ संकल्पना विदेशात लोकप्रिय असून त्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम पुरुषांसोबत तरुण मुली नातं ठेवतात. त्यामध्ये पैसे, गिफ्ट्स, ट्रिप्स मिळतात. भारतातही डेटिंग...
'शुगर डॅडी' ही संकल्पना आपण कदाचित ऐकली असेल. भारतात ती फारशी प्रचलित नाही, पण परदेशात मात्र ही संकल्पना खूप सामान्य आहे. या नात्यात तरुण मुली स्वतःपेक्षा खूप मोठ्या वयाच्या पुरुषांशी नातं ठेवतात. त्या पुरुषांना शारीरिक सुख देण्याच्या बदल्यात त्या महागड्या भेटवस्तू, प्रवास, आणि रोजच्या गरजा पूर्ण करून घेतात.
भारतात काही जण स्वीकारतात हे नातं
पश्चिम देशांमध्ये 'शुगर डॅडी'चं हे नातं वैध आणि संमतीवर आधारित मानलं जातं. विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये, SeekingArrangement सारख्या डेटिंग अॅप्सवरून अशा नात्यांना प्रोत्साहन दिलं जातं. भारतातसुद्धा काही वेळा अशा घटना समोर येतात, मात्र इथे यावर प्रचंड वाद होतो. समाजाच्या भीतीपोटी अनेक मुली अशा गोष्टींपासून दूर राहतात, पण काही निर्भय मुली हे नातं खुलेपणाने स्वीकारतात.
advertisement
"असे प्रकार लाजीरवाणे आहेत"
असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती आपल्या आजोबांच्या वयाच्या व्यक्तीच्या छातीजवळ डोकं ठेवून झोपलेली दिसते. या व्हिडीओत ती वृद्ध पुरुषाला आधी किस करते आणि त्यानंतर तोही तिला ओठांवर किस करतो. हा व्हिडीओ बघून अनेक सोशल मीडिया युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. काहींनी या नात्याला समर्थन दिलं, तर अनेकांनी हे अनैतिक, अश्लील आणि समाजासाठी लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
कोरोनानंतरचा हा परिणाम
भारतात मोठ्या वयोत्तरीत नात्यांकडे संशयाने पाहिलं जातं. त्यामुळे अशा व्हिडीओंवर समाजातील प्रतिक्रिया मिश्र आणि तीव्र असतात. सन 2020 मध्ये SeekingArrangement या अॅपवर भारतात जवळपास 8 लाख युजर्स होते. त्यामध्ये 482,734 शुगर डॅडी आणि 341,857 शुगर बेबी होत्या. विशेषतः कोविड काळात आणि बेरोजगारी वाढल्यानंतर अनेक विद्यार्थ्यींनी अशा नात्यांमध्ये प्रवेश केला होता.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 6:02 PM IST
मराठी बातम्या/Viral/
प्रेम की व्यवहार? भारतातही वाढतोय ‘शुगर डॅडी’चा ट्रेंड, सोशल मीडियावर का होतीय तुफान चर्चा?