VIDEO : प्रेम की वेडेपणा! गर्लफ्रेंडनं सांगितलं आणि बॉयफ्रेंडनं 'त्या' ठिकाणी सजवला मंडप
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लग्नाचा सीझन सुरु असून अनेक लोक लग्नबंधनात अडकत आहेत. लग्नाचा प्रत्येक क्षण खास असावा असं प्रत्येक तरुण तरुणीला वाटत असतं. त्यामुळे ते स्वतःच्या लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात.
नवी दिल्ली : लग्नाचा सीझन सुरु असून अनेक लोक लग्नबंधनात अडकत आहेत. लग्नाचा प्रत्येक क्षण खास असावा असं प्रत्येक तरुण तरुणीला वाटत असतं. त्यामुळे ते स्वतःच्या लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर अशा हटके लग्नांच्या चर्चा पहायला मिळत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधतोय. ज्यामध्ये होणाऱ्या बायकोच्या हट्टासाठी तरुणानं चक्क बर्फात थाटला मंडप.
हटके लग्नाचा एक व्हिडीओ इंटरनेटवर जोरादर व्हायरल होतोय, ज्यामध्ये वधू वरानं चक्क -25 डिग्रीमध्ये लग्न केलं. होणाऱ्या बायकोच्या इच्छेसाठी तरुणानं थेट बर्फवृष्टीतच मंडप टाकला.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ गुजरातमधील एका कपलचा आहे. त्यांनी हिमाचलमध्ये आपलं डेस्टिनेशन वेडिंग पार पाडलं. हिमाचलमघील स्पीची व्हॅलीमध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नाच्या वेळी बर्फवृष्टी होत होती आणि तापमान -25 डिग्री होतं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरी नवरी दोघंही थंडीनं थरथर कापत आहेत. बाकीचे लोकही गरम कपडे घालून आहेत. मात्र हौसेसाठी त्यांनी हे केलं.
advertisement
@iAjay_Banyal नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 38 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे.
स्पीति के मुरंग में माइनस 25 में डेस्टिनेशन वेडिंग की शानदार रील pic.twitter.com/SRJlJh2GVx
— Ajay Banyal (@iAjay_Banyal) February 27, 2024
advertisement
दरम्यान, लग्नांमधील असे निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रत्येक लग्नात काही ना काही खास गोष्टी होत असतात. काही हटके लग्नांचे व्हिडीओ मात्र काहीच वेळाच इंटरनेटवर खळबळ माजवताना दिसतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 01, 2024 6:08 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : प्रेम की वेडेपणा! गर्लफ्रेंडनं सांगितलं आणि बॉयफ्रेंडनं 'त्या' ठिकाणी सजवला मंडप







