advertisement

'नात्याला काही नाव नसावे...' 103 व्या वर्षी आजोबांनी थाटला संसार, नवरी मिळाली 49 वर्षांची!

Last Updated:

प्रेमात लोक आंधळे होतात, असं म्हटलं जातं. कारण वय, जात, धर्म, रंग अशा गोष्टींना बाजूला सारुन लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेमात पडलेल्या अनेक जोडप्यांच्या हटके घटना समोर येत असतात.

103 व्या वर्षी आजोबांनी थाटला संसार
103 व्या वर्षी आजोबांनी थाटला संसार
नवी दिल्ली : प्रेमात लोक आंधळे होतात, असं म्हटलं जातं. कारण वय, जात, धर्म, रंग अशा गोष्टींना बाजूला सारुन लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेमात पडलेल्या अनेक जोडप्यांच्या हटके घटना समोर येत असतात. अशातच आणखी एक घटना चर्चेत आलीय, ज्यामध्ये 103 वर्षांच्या व्यक्तीला 54 वर्षांनी लहान महिलेवर प्रेम झालं. मग त्यानं तिच्याशी लग्न केलं. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलंय.
सोशल मीडियावर चर्चेत आलेलं हे प्रकरण, भोपाळमधील आहे. याठिकाणच्या हबीब नजर यांच्या लग्नानं सध्या सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते एक स्वतंत्रता संग्राम सेनानी असून त्यांनी आता 103 व्या वर्षी तिसरं लग्न केलं आहे. त्यांनी त्यांच्या वयापेक्षा 54 वर्षांनी लहान असलेल्या महिलेशी संसार थाटलाय. म्हणजे त्या महिलेचं वय 49 आहे.
advertisement
दरम्यान, हबीब यांनी त्यांच्या तिसऱ्या लग्नाविषयी सांगितलं की, त्यांच्या दोन्ही बायकांचं निधन झालंय. त्यांची देखरेख करायला कोणीच नाही त्यामुळे त्यांनी हे तिसरं लग्न केलंय. याविषयी त्यांच्या बायकोनं सांगितलं की, मी खूप विचार करुन हे लग्न केलं आहे आणि मी या लग्नानं आनंदी आहे.
दरम्यान, असं वयाचं बंधन झुकारुन देत अनेक लोक आपला संसार थाटत असतात. आजकाल वय हा फक्त आकडा असून लोक ते सिद्ध करत आहेत. कधी पत्नी वयानं मोठी असते तर कधी पती वयानं मोठी असते. मात्र काही कारणास्तव किंवा प्रेमामुळे लोक वयाला विसरुन एकत्र येऊन आनंदी राहतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
'नात्याला काही नाव नसावे...' 103 व्या वर्षी आजोबांनी थाटला संसार, नवरी मिळाली 49 वर्षांची!
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement