हिंमत करून पिरॅमिडमध्ये गेली व्यक्ती; आत जाताच जे दिसलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
एका ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरने एका मोठ्या पिरॅमिडमध्ये प्रवेश केला होता आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी दिसल्या.
नवी दिल्ली : इजिप्तचे पिरॅमिड हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जिथं शेकडो लोक भेट देतात. इजिप्तची राजधानी कैरोपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या गिझामधील पिरॅमिड्स सर्वात प्रसिद्ध आहेत. इथं रेड पिरॅमिड आहे. गिझाच्या खुफू आणि खाफ्रे पिरॅमिडनंतर कैरोचा रेड पिरॅमिड इजिप्तमधील सर्वात मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी, एका पर्यटकाने या पिरॅमिडमध्ये प्रवेश केला आणि त्याने जे काही पाहिले ते पाहून त्याचे डोळे विस्फारले.
सॅम मेफेअरने ऑक्टोबर 2023 मध्ये त्याच्या इम्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो रेड पिरॅमिडमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. पिरॅमिड इतका मोठा आहे, पण त्याच्या आत जाण्याचा मार्ग बोगद्यासारखा आहे. तो फक्त 3 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. तो बोगदा सुमारे 61 मीटर लांब होता आणि 27 अंशांच्या कोनात वाकलेला होता.
advertisement
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सॅम त्या पिरॅमिडच्या बोगद्यातून मोठ्या कष्टाने खाली जात आहे. लाकडी पायऱ्यांशेजारी रेलिंग केले आहे, जेणेकरून ते सहज खाली जाऊ शकतील.
आतून कसा आहे पिरॅमिड?
खाली जाताना त्याला 12 मीटर लांब शाफ्ट दिसला. आत जाताच त्याला 40 फूट उंच छत दिसली ती सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा तो मुख्य चेंबरमध्ये गेला तेव्हा त्याला फरशी अजिबात दिसत नव्हती. पिरॅमिड लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी हे कृत्य केलं असावं, असा त्यांचा दावा आहे. त्यांना एक गोष्ट आश्चर्यचकित करणारी होती की जर पिरॅमिडमध्ये काहीतरी मोठं होतं जे काढून टाकायचं होतं, तर फक्त एक पॅसेज तोडून रुंदीकरण का केलं गेलं? बाकीचे पॅसेज आणि बाहेर जाण्याचे रुंदीकरण का केले नाही? छतावरील काही पेंटिंग्ज आणि भिंतींवरची डिझाइन्सही त्यांनी पाहिली. तो सांगतो की रेड पिरॅमिडमध्ये दोन अँटीचेंबर्स आहेत आणि एक मुख्य कक्ष आहे.
advertisement
हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एकाने सांगितले की ही कोणाचीही कबर नसावी, कारण खाली एकही मृतदेह दिसत नव्हता. एवढ्या खालच्या दिशेने जाण्याचे धाडस त्या व्यक्तीने कस केलं, याचंही लोकांनाही आश्चर्य वाटलं आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
August 03, 2024 10:02 AM IST
मराठी बातम्या/Viral/
हिंमत करून पिरॅमिडमध्ये गेली व्यक्ती; आत जाताच जे दिसलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल


