advertisement

कुंभमेळ्यातील 'मोनालिसा' कमवते किती? म्हणाली, "देवाची कृपा आहे, लोक जे बोलतात ते.."

Last Updated:

महाकुंभ 2025 मध्ये गजरे विकत असलेली मोनालिसा तिच्या डोळ्यांमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली. आज तिचं पहिलं गाणं 'साधगी' रिलीज झालं असून, तिच्या सौंदर्याचं आणि... 

Monalisa viral girl
Monalisa viral girl
कुंभमेळ्यापासून तिच्या सुंदर डोळ्यांनी लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या व्हायरल गर्ल मोनालिसाचं पहिलं गाणं 'साधगी' प्रदर्शित झालं आहे. महाकुंभातून मोनालिसाचं नशीब इतकं चमकलं की, ती रातोरात सेलिब्रिटी बनली. सध्या ती तिच्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आहे. या गाण्यात मोनालिसाला पाहून तुम्हीही म्हणाल, 'भाई, नशीब असेल तर मोनालिसासारखं...' मोनालिसा बऱ्याच काळापासून या प्रोजेक्टवर काम करत होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ती किती कमाई करत आहे, हे सांगितलं.
महाकुंभात मोनालिसा गजरे विकून आपला उदरनिर्वाह चालवत होती, पण आज ती आलिशान जीवनशैली जगत आहे. तिने तिच्या 'साधगी' गाण्याने अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकले आहे. तिचा पहिला म्युझिक व्हिडीओ उत्कर्ष सिंहसोबत प्रदर्शित झाला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे.
मोनालिसा किती कमावतेय?
नुकतेच इन्स्टंट बॉलिवूडशी बोलताना मोनालिसाने ती किती कमाई करत आहे, हे सांगितलं. खरं तर, जेव्हा व्हायरल गर्लला विचारण्यात आलं की, 'लोक म्हणतात की तुम्ही आता लाखो-करोडो रुपये कमवत आहात; मग तुम्ही किती कमवत आहात?'
advertisement
मोनालिसाने सांगितलं ती किती कमावतेय
या प्रश्नाचं उत्तर तिने हसत दिलं. ती म्हणाली, "हो... ही बाबा महाकाल आणि गंगा मैय्याची कृपा आहे... थोडंफार येतंय आणि लोक जे बोलतात ते खरं झालं, तर करोडो आणि अब्जो रुपयेही आले तर चांगलं होईल."
advertisement
युजर्सना मोनालिसाचं गाणं आवडलं
व्हायरल गर्ल मोनालिसाचा पहिला म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला खूप प्रेम दिलं. एकाने लिहिलं की, मोना खूप सुंदर आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, ती खूप सुंदर, नशिबवान मुलगी आहे. आणखी एका वापरकर्त्याने म्हटलं, 'म्हणूनच तिचं नाव मोनालिसा आहे; तुम्ही तिला ज्या दृष्टीने बघाल, ती तशीच दिसेल. खूप छान गाणं.' काही वापरकर्त्यांनी लाल हार्ट इमोजी देऊन तिला प्रेम दिलं आहे. तर काहीजण तिच्या मेहनतीचं कौतुक करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
कुंभमेळ्यातील 'मोनालिसा' कमवते किती? म्हणाली, "देवाची कृपा आहे, लोक जे बोलतात ते.."
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement