Monsoon Tips : पावसाळ्यात वीज पडण्याचा धोका कोणाला सर्वाधीक असतो? यापासून कसं वाचावं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पावसाळ्याच्या दिवसात वीज पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे. 1872 मध्ये, शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन यांनी पहिल्यांदा ढगांमध्ये वीज पडण्याचे नेमके कारण स्पष्ट केले.
मुंबई : पाऊस पडायला सुरुवात झाली की वीज पडण्याचा धोका ही वाढतो. अनेक ठिकाणी वीज पडल्याचं तुम्ही ऐकलं असेल. ही वीज पडली तर माणसाचं वाचणं शक्य नाही. कारण तिची पावर इतकी जास्त असते की माणसाच्या शरीराची राख होते. मग अशावेळी वीजेपासून कसं वाचायचं? हा महत्वाचा प्रश्न उपस्थीत होतो. शिवाय कोणत्या व्यक्तीवर वीज पडते असाही प्रश्न उपस्थीत होतो. अशावेळी लोकांना हे जर आधी कळलं तर प्राण वाचवण्यात मदत मिळते. चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ.
पावसाळ्याच्या दिवसात वीज पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे. 1872 मध्ये, शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन यांनी पहिल्यांदा ढगांमध्ये वीज पडण्याचे नेमके कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले होते की ढगांमध्ये पाण्याचे छोटे कण असतात, जे हवेशी घर्षण झाल्यामुळे चार्ज होतात. काही ढग पॉझिटिव्ह चार्ज होतात, तर काही निगेटिव्ह चार्ज असतात
जेव्हा दोन्ही प्रकारचे चार्ज असलेले ढग आकाशात एकमेकांवर आदळतात तेव्हा लाखो व्होल्ट वीज निर्माण होते. काहीवेळा अशा प्रकारे निर्माण होणारी वीज पृथ्वीपर्यंत पोहोचते एवढी असते. या घटनेलाच विद्युल्लता म्हणतात.
advertisement
या ठिकाणी सर्वाधिक वीज पडते
क्लायमेट रेझिलिएंट ऑब्झर्व्हिंग सिस्टम्स प्रमोशन कौन्सिल (CROPC) ने भारतीय हवामान विभागाच्या सहकार्याने एक नकाशा जारी केला आहे. ज्यामध्ये वीज पडलेल्या भागांची माहिती दिली आहे. त्यानुसार वीज पडण्याच्या सर्वाधिक घटना मध्य प्रदेशात घडतात. यानंतर छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि बंगालचा क्रमांक लागतो. या राज्यांव्यतिरिक्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकातही वीज पडण्याच्या घटना घडतात.
advertisement
विजेपासून स्वतःला कसे वाचवायचे?
खराब हवामानात किंवा विजा चमकत असताना तुम्ही घराच्या आत असता, तुम्ही विद्युत उपकरणांपासून दूर असले पाहिजे. या काळात वायर्ड टेलिफोन वापरू नये. खिडक्या आणि दारे बंद करून व्हरांडा आणि गच्चीपासून दूर राहावे. याशिवाय विजेचे चांगले वाहक असलेल्या वस्तूंपासूनही दूर राहिले पाहिजे. घरातील धातूचे पाइप, नळ, कारंजे, वॉश बेसिन इत्यादींच्या संपर्कापासून दूर राहावे.
advertisement
घराबाहेर असाल तर विजेच्या खांबापासून दूर राहावे. याशिवाय झाडे विजेला आकर्षित करतात. त्यामुळे वीज पडताना झाडाखाली उभे राहू नये. उंच इमारती असलेल्या भागात आश्रय घेऊ नये आणि मोकळ्या मैदानात काही अंतरावर उभे राहावे. प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्या वाहनातच राहावे. मोकळे छत असलेल्या वाहनात बसू नये. याशिवाय दुचाकी, विजेचे किंवा टेलिफोनचे खांब तारांचे कुंपण आणि मशिन इत्यादीपासून दूर रहावे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 08, 2024 12:08 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Monsoon Tips : पावसाळ्यात वीज पडण्याचा धोका कोणाला सर्वाधीक असतो? यापासून कसं वाचावं?







