एक घरवाली एक बाहरवाली! मुंबई, पुणेकर Extra Marital Affairs मध्ये अव्वल, यादीत कितवा नंबर

Last Updated:

कुणाला मुंबईचा जोडीदार हवा असतो. तर कुणाला पुण्याचा. मुंबई-पुण्याची जोडी तशी लव्हस्टोरीबाबत फेमस आहेत. पण एका अभ्यासानुसार मुंबई, पुण्यातील लोक रिलेशनशिपमध्ये सगळ्यात जास्त फसवतात असं समोर आलं आहे.

News18
News18
नवी दिल्ली : लग्न जुळवणारे मॅट्रिमोनी आणि जोडीदार शोधून देणारे डेटिंग अॅप्सबाबत तुम्हाला माहितीच असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की असे काही अॅप्स आहेत जे लोकांना त्यांच्या पत्नींव्यतिरिक्त इतर जोडीदारांसोबत रोमान्स करण्याची संधी देतात. अशाच एका अ‍ॅपने त्यांच्या डेटाच्या आधारे आता भारतातील कोणत्या शहरात विवाहित लोक सर्वाधिक फसवणूक करतात हे उघड केले आहे. अॅपच्या यादीतील टॉप पाच शहरे आम्ही तुम्हाला सांगतो.
प्रत्येकाला त्याच्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. या अपेक्षांमध्ये ठिकाणही असतं. जसं कुणाला मुंबईचा जोडीदार हवा असतो. तर कुणाला पुण्याचा. मुंबई-पुण्याची जोडी तशी लव्हस्टोरीबाबत फेमस आहेत. पण एका अभ्यासानुसार मुंबई, पुण्यातील लोक रिलेशनशिपमध्ये सगळ्यात जास्त फसवतात असं समोर आलं आहे. लग्न झाल्यानंतरही विवाहबाह्य संबंध असण्यामध्ये मुंबई, पुणेकर अव्वल आहेत.
advertisement
रिलेशनशिपमध्ये फसवणूक करणारी शहरं म्हटलं की कदाचित तुम्हालाही दिल्लीचे नाव या यादीत सर्वात वरती असल्याचा विचार येईल. पण तसं नाहीये. दिल्ली पहिल्या पाच यादीत आहे पण वरच्या स्थानावर नाही. दिल्लीचं नाव चौथ्या स्थानावर आहे. यामध्ये पुणे पाचव्या स्थानावर आहे. यानंतर दिल्ली आणि कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्या वर मुंबई आहे आणि सर्वात वर बंगळुरू आहे. या शहरांमध्ये राहणारे विवाहित लोक त्यांच्या स्वतःच्या जोडीदाराव्यतिरिक्त नवीन जोडीदार शोधण्यासाठी ग्लीडेनवर सक्रिय राहतात.
advertisement
महानगरांमध्ये ही पाच शहरं अव्वल स्थानावर असताना, ग्लीडेनच्या यादीने टियर 2 आणि टियर 3 शहरांची यादी देखील जाहीर केली आहे. या छोट्या शहरांमध्येही आता विवाहबाह्य संबंधांकडे लोकांची आवड वाढू लागली आहे. ग्लीडेन अ‍ॅपच्या आकडेवारीनुसार, महानगरांच्या तुलनेत लहान शहरांमध्ये विवाहबाह्य संबंधांची संख्या तिप्पट वेगाने वाढत आहे. ग्लीडेनच्या माहितीनुसार, जयपूर या यादीत अव्वल स्थानावर आहे. यानंतर चंदीगड, लखनऊ आणि पाटणाची पाळी येते.
advertisement
ग्लीडेनने याचं कारणही स्पष्ट केलं या छोट्या शहरांमध्ये लोक संयुक्त कुटुंबात राहतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर अनेक निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत, संधी मिळताच ते बाहेर स्वतःसाठी जोडीदार शोधू लागतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
एक घरवाली एक बाहरवाली! मुंबई, पुणेकर Extra Marital Affairs मध्ये अव्वल, यादीत कितवा नंबर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement