Naughty Nani Video : बँकॉकचं विमान अन् डॉक्टरची पोलखोल, सांगितले असे किस्से सोशल मीडियावर फक्त नानीचीच चर्चा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
नानी आपल्या नातवंडांच्या आणि नातेवाईकांच्या घोळक्यात बसते, तेव्हा गप्पांची अशी काही मैफल रंगते की हसून हसून लोकांच्या डोळ्यांत पाणी येतं. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये नानीने अशा काही गुगल्या टाकल्या आहेत की, इंटरनेटवरचे लोकही आता नानीचे फॅन झाले आहेत.
मुंबई : सोशल मीडियाच्या जगात सध्या एका नानीची तुफान चर्चा आहे. ही नानी साधीसुधी नसून ती आपल्या 'नॉटी' अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा नानी आपल्या नातवंडांच्या आणि नातेवाईकांच्या घोळक्यात बसते, तेव्हा गप्पांची अशी काही मैफल रंगते की हसून हसून लोकांच्या डोळ्यांत पाणी येतं. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये नानीने अशा काही गुगल्या टाकल्या आहेत की, इंटरनेटवरचे लोकही आता नानीचे फॅन झाले आहेत.
1. जेव्हा 'बँकॉकची फ्लाईट' एअरपोर्टवरूनच परत आली
नानीने गप्पांच्या ओघात जीजा-सालीच्या नात्यावर एक मिश्किल जोक सांगितला. ती म्हणाली, "एका जिजूने आपल्या मेहुणीला (सालीला) अचानक किस केलं आणि मोठ्या रुबाबात विचारलं, काय फील झालं तुला?' त्यावर मेहुणीने दिलेला रिप्लाय म्हणजे सिक्सर होता. मेहुणी म्हणाली, "मला तर असं वाटलं की मी बँकॉकमध्ये उतरली आणि एअरपोर्टवरूनच परत आली!" नानीने हा किस्सा सांगताच घरात हशा पिकला.
advertisement
advertisement
2. "दादी मुंह खोलो!"... पण नानीने तर डॉक्टरचंच तोंड बंद केलं!
नानीचा दुसरा किस्सा तर त्याहूनही भारी आहे. नानी म्हणते, "एक आजी आपल्या तपासणीसाठी डॉक्टरकडे गेल्या होत्या. डॉक्टर तपासणी करताना म्हणाले, 'दादी, जरा तुमचं तोंड उघडा (मुंह खोलो), मला तपासू द्या.' त्यावर त्या आजींनी असा काही बॉम्ब टाकला की डॉक्टरची बोलतीच बंद झाली.
advertisement
त्या म्हणाल्या, "तुझी बायको त्या कंपाउंडरसोबत बाहेर फिरतेय, आता यापेक्षा जास्त मी तोंड उघडू शकत नाही, नाहीतर तुझं घर मोडेल."
advertisement
नानीचा स्वॅग आणि कौटुंबिक आनंद
'नॉटी नानी'चे हे किस्से केवळ विनोद नाहीत, तर ते आजच्या गंभीर आणि तणावपूर्ण आयुष्यात आनंदाचे छोटे छोटे डोस आहेत. नानीचा तो आत्मविश्वास, ती बोलण्याची लय आणि डोळ्यांतली चमक सांगते की, म्हातारपण म्हणजे फक्त आजारपण नाही, तर तो आयुष्याचा सर्वात मोकळा आणि बिनधास्त काळ असू शकतो.
advertisement
नातवंडांसोबत अशा प्रकारे मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारी आणि त्यांना चोख उत्तर देणारी ही नानी खऱ्या अर्थाने फॅमिली रॉकस्टार आहे. नानीने डॉक्टरचं तोंड बंद केलं असलं तरी, या व्हिडिओने मात्र नेटकऱ्यांची तोंडं हसण्यासाठी कायमची उघडली आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 7:53 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Naughty Nani Video : बँकॉकचं विमान अन् डॉक्टरची पोलखोल, सांगितले असे किस्से सोशल मीडियावर फक्त नानीचीच चर्चा








