31 च्या पार्टीनंतर तरुणाईचं विचित्र रुप, बेंगळुरू आणि गुरुग्राममधील Video Viral होताच सोशल मीडियावर संतापाची लाट

Last Updated:

2026 च्या स्वागतासाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरले, पण जल्लोषाच्या नावाखाली जे समोर आले ते पाहून अनेकांनी कपाळावर हात मारून घेतला आहे. 'नम्मा बेंगळुरू' ते सायबर सिटी 'गुरुग्राम'पर्यंत नेमके काय घडले?

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करणे, ही आता केवळ एक परंपरा राहिलेली नाही, तर तो एक मोठा सोहळा झाला आहे. घराघरात, हॉटेल्समध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी जल्लोष केला जातो. पण, जेव्हा हा जल्लोष मर्यादेच्या पलीकडे जातो, तेव्हा मात्र आनंदाचे रूपांतर चिंतेत होते. 1 जानेवारी 2026 च्या पहाटेपासूनच सोशल मीडियावर अशा काही व्हिडिओंनी धुमाकूळ घातला आहे, ज्याने सार्वजनिक वर्तवणूक आणि सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
बेंगळुरू आणि गुरुग्राम सारख्या मोठ्या शहरांमधून समोर आलेले हे दृश्य केवळ गर्दीचे नाहीत, तर ते बेधुंद तरुणाईच्या विदारक वास्तवाचे आहेत.
बेंगळुरूमध्ये नेमकं काय घडलं?
बेंगळुरूच्या कोरामंगला आणि नाईटलाईफसाठी प्रसिद्ध असलेल्या भागातील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये एक तरुणी अतिमद्यपानामुळे स्वतःला सावरू शकत नसल्याचे दिसत आहे. पोलीस आणि काही नागरिक तिला आधार देऊन गर्दीतून बाहेर काढत आहेत. तिची अवस्था पाहून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अनेक तरुणी दारुच्या नशेत मित्रांच्या किंवा अनोळखी व्यक्तींच्या आधाराने चालताना दिसत आहेत. काही ठिकाणी नागरिक त्यांना गर्दीपासून वाचवण्याचा आणि सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
advertisement
एका स्थानिक रहिवाशाने म्हटले की, "कोरामंगलामध्ये हे आता सामान्य झाले आहे. पूर्वी लोक अशा गोष्टींचे व्हिडिओ बनवून इंटरनेटवर टाकायला संकोचायचे, पण आजच्या 'जनरेशन z'ला (Gen Z) सर्व काही ऑनलाइन टाकायचे असते."
केवळ दक्षिण भारतच नाही, तर उत्तर भारतातही परिस्थिती काही वेगळी नव्हती. गुरुग्रामच्या सेक्टर 29 मधील व्हिडिओंमध्ये काही लोक मद्यधुंद अवस्थेत चक्क रस्त्याच्या कडेला पडलेले दिसत आहेत. रिकाम्या रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत तरुणांची दिशाहीन भटकंती सुरू होती. सायबर हब परिसरातील गर्दी पाहून एक युजर म्हणाला, "हे पाहूनच आता घाबरल्यासारखे होत आहे, त्यापेक्षा घरी राहून सुरक्षित सेलिब्रेशन केलेले कधीही चांगले."
advertisement
advertisement
"पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण?" सोशल मीडियावर वाद
हे व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी दोन गट पडले आहेत. काहींनी याला वैयक्तिक स्वातंत्र्य म्हटले असले, तरी बहुतांश लोकांनी या हुल्लडबाजीवर ताशेरे ओढले आहेत. "हा केवळ आनंद नाही, तर घराबाहेर जाऊन पार्टी करण्याचा एक सामाजिक दबाव आहे," असे एका युजरने नमूद केले. "आपण पाश्चात्य सण साजरे करण्याच्या नादात आपल्या मुळापासून आणि संस्कृतीपासून दूर जात आहोत," अशी टीका एकाने केली.
advertisement
advertisement
advertisement
बेंगळुरूच्या एका रहिवाशाने संताप व्यक्त करत म्हटले की, "नम्मा बेंगळुरूसाठी हे अजिबात स्वीकारार्ह नाही. सार्वजनिक ठिकाणी अभद्र वर्तन करणाऱ्यांवर कडक पोलीस कारवाई आणि मोठा दंड आकारला पाहिजे." नवीन वर्षाचा उत्साह असणे स्वाभाविक आहे, पण या उत्साहात स्वतःचे भान विसरणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणे कितपत योग्य आहे? हे व्हिडिओ केवळ एका रात्रीची हुल्लडबाजी नसून, बदलत्या जीवनशैलीचे आणि हरवत चाललेल्या शिस्तीचे निदर्शक आहेत. सेलिब्रेशनच्या नावाखाली आपली सुरक्षा धोक्यात येणार नाही, याची काळजी घेणे आता काळाची गरज बनली आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
31 च्या पार्टीनंतर तरुणाईचं विचित्र रुप, बेंगळुरू आणि गुरुग्राममधील Video Viral होताच सोशल मीडियावर संतापाची लाट
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement