advertisement

अधिकारी हिरव्या शाईचं पेन का वापरतात, तुम्हाला माहिती आहे का यामागचं कारण?

Last Updated:

शाईचे रंग खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही कधी कोणाला हिरव्या शाईच्या पेनने लिहिताना किंवा सही करताना पाहिलं आहे का?

News18
News18
मुंबई : शाळेत तिसरी किंवा चौथीच्या वर्गात मुलं पेनने लिहायला लागतात तेव्हा ते स्वतःला खूप मोठे आणि मॅच्युअर समजू लागतात. शालेय विद्यार्थ्यांना निळ्या शाईच्या पेनने लिहिण्यास सांगितलं जातं, तर काहीवेळा ते उत्तरांमधून प्रश्न किंवा शीर्षक वेगळं करण्यासाठी काळ्या शाईच्या पेनने लिहितात. तुम्हाला आठवत असेल की शाळेत शिक्षक नेहमी लाल पेनने लिहायचे आणि वहीमध्ये जास्त लाल मार्क्स दिसले तर घरी पालकांकडून बोलणी किंवा मार खावा लागायचा. शाईचे रंग खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही कधी कोणाला हिरव्या शाईच्या पेनने लिहिताना किंवा सही करताना पाहिलं आहे का?
अहवालानुसार, राजपत्रित अधिकारी किंवा गॅजेटेड ऑफिसर हिरवा पेन वापरतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Quora वर कोणीतरी याच्याशी संबंधित प्रश्न विचारला आहे. प्रश्न असा आहे - "अधिकारी हिरव्या शाईचं पेन का वापरतात?" Quora एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर सामान्य लोक त्यांचे प्रश्न विचारतात आणि सामान्य लोक त्यांची उत्तरं देतात. त्यामुळे त्यांची उत्तरं पूर्णपणे बरोबर असतीलच असं नाही.
advertisement
लोकांनी काय दिल्या प्रतिक्रिया?
या प्रश्नावर अनेकांनी उत्तरंही दिली आहेत. क्षितिज राज नावाच्या युजरने लिहिले, “सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांना हिरवी शाई वापरण्याची परवानगी नाही. हिरवी शाई असलेले पेन राजपत्रित अधिकारीच वापरतात.
हिरव्या शाईचं पेन वापरण्यामागचं सर्वांत मोठं कारण म्हणजे कार्यालयात एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी कॉपी करणं थोडं कठीण आहे. खरं तर हे ठोस कारण नाही, कारण बनावट सही हिरव्या शाईनेदेखील करता येते. दुसरं सर्वांत मोठं कारण म्हणजे हिरव्या शाईने केलेली स्वाक्षरी पाहून ती राजपत्रित अधिकाऱ्याने केली असावी असं वाटतं. तिसरं कारण म्हणजे राजपत्रित अधिकारीदेखील इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी असं करतात."
advertisement
स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी कर्मचारी मधुकर पारे यांनीही त्यांचं मत मांडलं. “हे सरकारी प्रोटोकॉलनुसार झालं असावं. कदाचित ते एखाद्या अधिकाऱ्याचा दर्जा दाखवण्यासाठी असावं. स्टेट बँकेतील सहाय्यक महाव्यवस्थापक आणि निरीक्षक हिरवी शाई वापरतात.
इतर स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईचा रंगही ठरलेला असतो. इतर स्तरावरील कर्मचारी/अधिकारी यांना या रंगांच्या शाईसह पेन वापरण्याची परवानगी नाही. जरी ही व्यवस्था बँकेच्या आतील कर्मचाऱ्यासाठी आहे. परंतु मर्यादित ज्ञान असलेले काही अधिकारी बाहेरच्या लोकांना रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न करायचे," असं पारे म्हणाले.
advertisement
इतर सोर्स काय म्हणतात?
ही Quora वरील उत्तरं आहेत, परंतु इतर सोर्स शोधल्यानंतर आढळलं की राजपत्रित अधिकार्‍यांनी हिरव्या शाईचं पेन वापरणं आवश्यक आहे, असा कोणताही नियम नाही. बर्‍याच वेळा ते लिपिक किंवा खालच्या पदावरील लोकांच्या सह्यांमध्ये फरक करण्यासाठी हिरवा रंग वापरतात. काही अहवालांमध्ये असंही दिसून आलंय की अधिकारी कोणतेही कागदपत्रं अटेस्ट करण्यासाठी हिरव्या पेनाचा वापर करतात. काही लेखांनुसार, हा फक्त एक ट्रेंड आहे जो सुरू झाला आहे, त्यामागे कोणताही नियम नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
अधिकारी हिरव्या शाईचं पेन का वापरतात, तुम्हाला माहिती आहे का यामागचं कारण?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement