यूकेत इंडियन-अमेरिकन तरुणाला 'देवदूतांनी' वाचवलं; एकाच दिवसात 6 वेळा हृदय बंद पडूनही जिवंत
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
एकाच दिवसात 6 वेळा हृदय बंद पडलेल्या तरुणाला डॉक्टरांनी वाचवणं हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
लंडन, 06 ऑक्टोबर : ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा प्रत्यय लंडनमध्ये शिकणाऱ्या एका इंडियन-अमेरिकन विद्यार्थ्याच्या बाबतीत नुकताच आलाय. या विद्यार्थ्याचं हृदय एकाच दिवसात सहा वेळा बंद पडूनही त्याचा जीव वाचलाय. या धक्कादायक घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यानं वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्याने विचार बदलतात, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. असाच काहीसा प्रकार सिएटलचा रहिवासी आणि टेक्सासमधील बेलर विद्यापीठात शिकणाऱ्या अतुल राव या भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्यासोबत घडला. 27 जुलै 2023 रोजी राव हा त्याच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना रस्त्यावर कोसळलेला दिसला होता. या विद्यार्थ्यांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावली, पण रुग्णवाहिका येण्याआधी इम्पिरियल कॉलेज लंडन येथील सुरक्षा रक्षकानं राव याच्या छातीवर दाब (सीपीआर) देऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
advertisement
हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान असं आढळून आलं की, राव याच्या फुफ्फुसात रक्ताची गुठळी झाली होती, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचा रक्त पुरवठा थांबला होता. या स्थितीला ‘पल्मनरी एम्बोलिझम’ म्हणतात, व यामुळे रावला हृदयविकाराचा झटका आला होता. हॅमरस्मिथ हॉस्पिटलमधील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी अतुलला जिवंत ठेवण्यासाठी रात्रभर अथक परिश्रम घेतले. दुसऱ्या दिवशी त्याला एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (एसीएमओ) सिस्टीमची आवश्यकता असल्यानं सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेव्हा त्याची अवस्था वाईट होती, नंतर क्लॉट-बस्टिंग औषधांनी व लाईफ सपोर्ट सिस्टीममुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं.
advertisement
या बाबत इम्पिरियल कॉलेज हेल्थकेअर एनएचएस ट्रस्टच्या हॅमरस्मिथ हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर कन्सल्टंट डॉ. लुईस ठाकुरिया म्हणाले की, ‘टीमवर्कच्या मदतीनं अतुलला वाचवण्यात यश आलं. हे जवळजवळ अशक्य होतं. कारण एका दिवसात अतुलच्या हृदयाचे ठोके जवळपास 6 वेळा थांबले होते.’
तर, अतुलला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चालक निक सिलेट यानी या प्रसंगाविषयी सांगताना म्हटलं की, ‘जेव्हा मी अतुलला पाहिलं तेव्हा तो वाचेल अशी खात्री वाटत नव्हती. त्याचा जीव वाचवणं हा माझा 18 वर्षांच्या करिअरमधला सर्वांत खास क्षण ठरला आहे.’
advertisement
अतुल म्हणाला, 'जेव्हा मला जाग आली, तेव्हा मला कळालं की माझ्याबरोबर नेमकं काय घडलं. मला समजलं की मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडल्यानंतर मला आता जगण्याची ही दुसरी संधी मिळाली आहे. मला आता उर्वरित आयुष्यात इतरांना मदत करायची आहे. मी सध्या प्री-मेड ग्रॅज्युएशन करत असून यानंतर मी वैद्यकीय प्रॅक्टिससाठी पदवी घेणार आहे.’
advertisement
अतुलचे वडील अजय राव हे अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात. त्यांनी मुलाची प्रकृती जाणून घेतल्यानंतर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘हॅमरस्मिथ आणि सेंट थॉमस हॉस्पिटल आमच्यासाठी मंदिर आहे. आम्ही जेव्हाही लंडनला येऊ तेव्हा इथे नक्की जाऊ. लंडनमधील रुग्णवाहिका सेवा, हॅमरस्मिथ, सेंट थॉमस आणि रॉयल ब्रॉम्प्टन येथील वैद्यकीय पथकांच्या अथक परिश्रमामुळेच माझा मुलगा वाचला.’
advertisement
दरम्यान, अतुल राव याच्याबाबतीत घडलेला प्रकार हा वैद्यकीय क्षेत्रातील एक चमत्कारच असून, या प्रकाराची खूपच चर्चा सुरू आहे.
Location :
Delhi
First Published :
Oct 06, 2023 6:14 PM IST
मराठी बातम्या/Viral/
यूकेत इंडियन-अमेरिकन तरुणाला 'देवदूतांनी' वाचवलं; एकाच दिवसात 6 वेळा हृदय बंद पडूनही जिवंत









