सुंदर मुलगी पाहून वृद्धाचा पाय घसरला, सगळं काही विकलं, तंबूत राहण्याची आली वेळ

Last Updated:

ऑस्ट्रेलियातील 63 वर्षीय Tracey Skeates यांची इन्स्टाग्रामवर चार्लटसोबत ओळख झाली. ऑनलाइन प्रेमाच्या नावे चार्लटने त्यांच्याकडून २२ लाख रुपये घेतले. अखेरीस समजले की, चार्लट हा बनावट अकाउंट असून वापरलेले फोटो कोलंबियन मॉडेलचे होते.

News18
News18
असे म्हणतात की, माणूस वृद्धापकाळात एकटा पडतो आणि साथीदाराची गरज भासते. पण प्रत्येकालाच योग्य साथीदार मिळेल असे नाही. अशावेळी काही श्रीमंत लोक तरुण मुलींसोबत नातं जोडतात, तर काहीजण ऑनलाईन खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात. मात्र, अशा नात्यांमध्ये अनेक वृद्धांची फसवणूकही केली जाते.
ऑस्ट्रेलियातील 63 वर्षीय Tracey Skeates यांची ओळख अमेरिकेत राहणाऱ्या 'Charlotte' सोबत इन्स्टाग्रामवर झाली. ऑक्टोबर 2023 मध्ये दोघांची मैत्री झाली. एका आठवड्यात Tracey यांनी Charlotte ला फोन दुरुस्तीसाठी 500 ऑस्ट्रेलियन डॉलर्स पाठवले.
चार्लटने Tracey यांना सांगितले की, तिला ऑस्ट्रेलियाला यायचं आहे आणि Tracy सोबत लग्न करायचं आहे. ही गोष्ट ऐकून Tracey खूप आनंदी झाले. पण चार्लटने त्यांच्याकडून महिना 4000ऑस्ट्रेलियन डॉलर्स (भारतात 2 लाख रुपये) पाठवले.
advertisement
Tracey यांनी आतापर्यंत 22 लाख रुपये चार्लटला पाठवले आणि त्यासाठी आपली कार आणि महागडी गिटार विकली. चार्लटने अनेकवेळा विमानतळावर जाण्यापूर्वी अपघात, कोमा किंवा पोलीस केसची कारणे सांगून ऑस्ट्रेलियाला येण्याचं टाळलं. मात्र Tracey यांना हे समजलं नाही.
शेवटी, Tracey यांनी ‘रिव्हर्स इमेज सर्च’ केल्यानंतर समजलं की, चार्लटच्या फोटोमधील महिला म्हणजे Yisela Avendano नावाची कोलंबियन बिकिनी मॉडेल आहे. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
advertisement
फसवणूक समजूनही Tracey पैशांची मदत पाठवत राहिले. यामुळे ते आर्थिक अडचणीत आले. त्यांची मुलगी Tamika यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. पैसे संपल्यावर Tracey यांना तंबूत राहावं लागत आहे आणि त्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांना इतरांकडे देण्याचा विचार केला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
सुंदर मुलगी पाहून वृद्धाचा पाय घसरला, सगळं काही विकलं, तंबूत राहण्याची आली वेळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement