Pune Cat: 3BHK फ्लॅट, 300 मांजर आणि त्या दोघी! पुण्यात हे काय सुरू आहे? शेजाऱ्यांत घबराट..

Last Updated:

Pune Cat: पुण्यातील हडपसर भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका फ्लॅटमध्ये तब्बल 300 मांजरांसह एक महिला राहत असून रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे.

+
Pune

Pune Cat: 3BHK फ्लॅट, 300 मांजर आणि त्या दोघी! पुण्यात हे काय सुरू आहे? शेजाऱ्यांनी सांगितलं..

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही. आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या एका महिलेने एक दोन नव्हे तर तब्बल 300 हून अधिक मांजर पाळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून मार्व्हल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील 3बीएचके फ्लॅटमध्ये या मांजरांसह एक महिला राहतेय. त्यामुळेच हा विषय चर्चेचा विषय ठारत असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकल18 सोबत बोलताना येथील रहिवाशांनी याबाबत माहिती दिलीये.
advertisement
काय म्हणाले रहिवासी?
“मी गेली 10 वर्ष झालं इथे सोसायटी मध्ये राहत आहे. मांजर पाळण्याबाबत काही नसून त्याचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये असं वर्तन असलं पाहिजे. यामुळे येणारा उग्र वास आणि ड्रेनेज मध्ये जाणारं पाणी यामुळे सोसायटीमधील लोकांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या मांजराचा खूप जोरात रडण्याचा आवाज येतो. यामुळे ही आम्हाला खूप त्रास होत आहे, असं एका रहिवाशानं सांगितलं.
advertisement
जेवण तयार करताना असो की इतर वेळेस जेव्हा दरवाजा, खिडकी उघडतो तेव्हा प्रचंड घाण वास येतो. 2020 मध्ये आम्हाला समजलं की 9 नंबर फ्लॅट मध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडे मांजर आहेत. परंतु तेव्हा त्यांच्याकडे 50 मांजरी असल्याचं समजलं तेव्हा भीती वाटत होती. आम्ही पुणे महानगर पालिका, पोलीस प्रशासन यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडे या प्रश्नासबंधित तक्रार देखील दाखल केली. आता पालिका प्रशासनाने त्यांना या सबंधित विषयावर नोटीस देखील दिली आहे, असं एका रहिवासी महिलेनं सांगितलं.
advertisement
दोघी बहिणींना नोटीस
गेली 5 वर्षांपासून हे प्रकरण सुरु आहे. या मांजरामुळे काही तरी आजार पसरू शकतात. यामुळे प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. दरम्यान, या तक्रारीची दखल घेत पुणे महापालिकेने फ्लॅटच्या मालक रिंकू भारद्वाज आणि बहीण रितू भारद्वाज यांना नोटीस बजावली आहे. तसेच पुणे एसपीसीएने 48 तासांत फ्लॅटमधून मांजरी हटवण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या/Viral/
Pune Cat: 3BHK फ्लॅट, 300 मांजर आणि त्या दोघी! पुण्यात हे काय सुरू आहे? शेजाऱ्यांत घबराट..
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement