General Knowledge : मराठीवरील या सहा राज्यातील प्रेम पाहून ऊर अभिमानाने भरून येईल, मातृभाषे इतका लावतात जीव
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
General Knowledge Marathi language: गेल्या वर्षी केंद्र सरकारने मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी भाषा बोलणारी लोकसंख्या 14 कोटी पेक्षा जास्त आहे.पण महाराष्ट्र सोडून मराठी भाषा सर्वाधिक बोलणारी राज्ये कोणती हे तुम्हाला माहिती आहे का?
मुंबई: गेल्या वर्षी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा केंद्राने मराठीसह बंगाली, आसामी, प्राकृत आणि पाली या भाषांना असा दर्जा दिला होता. मराठी भाषा अभिजात झाल्याने अनेक फायदे होणार आहेत. ज्यात भाषेचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह, देशातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सुविधा, प्राचीन ग्रंथांचे अनुवादन, ग्रंथालयांना होणार फायदा आदी गोष्टींचा समावेश आहे.
मराठीला अभिजात भाषा मिळण्याच्या आधी तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मळ्याळम या 5 भाषा अभिजात होत्या. तसे पाहिला गेले तर भारतात मराठी भाषा बोलणारी लोकसंख्या 14 कोटी पेक्षा जास्त आहे. मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता मराठी जगातील दहावी तर भारतातील तिसरी भाषा आहे. या भाषेचा वय सुमारे 2 हजार 400 वर्ष इतके आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? देशातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशापैकी मराठी भाषा कोणत्या कोणत्या राज्यात किती लोक मराठी भाषा बोलतात.
advertisement
मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रात बोलली जात नाही तर देशातील अन्य राज्यात देखील ही भाषा बोलली जाते. ज्यात सातव्या क्रमांकावर छत्तीगड येतो. या राज्यात 1 लाख 44 हून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. सहव्या क्रमांकावर गोवा राज्य असून येथे 1 लाख 58 हजाराहून अधिक लोक मराठी बोलतात. पाचव्या स्थानावर ६ लाख 16 हजारहून अधिक लोक मराठी बोलतात, चौथ्या स्थानावर गुजरात असून येथे 9 लाख 20 हजारहून अधिक लोक मराठी बोलतात. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या मध्य प्रदेशमध्ये 12 लाख 31 हजारहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. 20 लाख 64 हजारहून अधिक जण कर्नाटकात मराठी बोलतात आणि अव्वल स्थानी अर्थात महाराष्ट्र असून येथे 8 कोटींहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात.
advertisement
महिला बँकेत पैसे काढण्यासाठी आली, चेकमधील तपशील वाचून कॅशियरला घाम फुटला
मराठी भाषा अन्य राज्यात देखील मोठ्या प्रमाणात बोलली जाते ज्यात तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ सारख्या दक्षिणेतील राज्यांचा समावेश आहे. तर दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मराठी बोलली जाते.
भारताबाहेर फिजी, मॉरिशस, इस्रायल, अमेरिका, युएई, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशात मराठी बोलली जाते. येथे मराठी भाषा बोलणारे हे महाराष्ट्रातून संबंधित राज्यात स्थाईक झालेले लोक आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2025 7:46 PM IST
मराठी बातम्या/Viral/
General Knowledge : मराठीवरील या सहा राज्यातील प्रेम पाहून ऊर अभिमानाने भरून येईल, मातृभाषे इतका लावतात जीव







