Bank Cheque Viral: महिला बँकेत पैसे काढण्यासाठी आली, चेकमधील तपशील वाचून कॅशियरला घाम फुटला

Last Updated:

IDBI Funny Check: बँकेतील कॅशिअर ही अशी व्यक्ती असते ज्याच्या हातात कोणाला किती पैसे द्यायचे याचे अधिकार असतात. पण अशा व्यक्तीकडे जर कोणी बँकेतील संपूर्ण पैसे मागितले तर काय होईल? अशीच मागणी करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

News18
News18
नवी दिल्ली: दोन दिवसांपूर्वी देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी १२ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करत सर्व सामान्य नोकरदारांना खुश केले. सर्व सामान्य जनतेला अर्थसंकल्पातील अनेक किचकट गोष्टी कळत नाहीत. पण ही गोष्ट फक्त बजेट पुरती लागू होत नाही तर अनेकदा बँकेतील सर्वसाधारण गोष्टींसाठी देखील माहिती नसल्याने मोठा गोंधळ होतो. अशाच एका गोंधळाची घटना एका बँकेत घडली ज्याची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे.
इंस्टाग्रामवरील @smartprem19 या अकाउंटवर आयडीबीआय बँकेच्या एका धनादेशाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा धनादेश संगीता नावाच्या महिलेने भरला असून तिने इतक्या विचित्र पद्धतीने तो भरला आहे की तो वाचून कोणालाही धक्का बसेल. चेकवरील तारीख डिसेंबर २०२४ ची आहे.फोटोमध्ये दिसते की, लाभार्थ्याच्या नावाच्या ठिकाणी संगीता लिहिले आहे. मात्र, ज्या ठिकाणी रक्कम शब्दांत लिहिणे अपेक्षित होते तिथे तिने 'जितके पैसे बँकेत आहेत!' असे लिहिले आहे. बँकेतून जितके पैसे काढणे अपेक्षित होते ते लिहण्या ऐवजी बँकेतील सगळे पैसे लिहल्याने चेक पाहून कॅशियरला देखील घाम फुटला असेल.
advertisement
सचिन तेंडुलकर शाळेतील मुलासारखा रडला, Pain Killer घेऊन झळकावले होते शतक
व्हायरल झालेल्या धनादेश खरा असल्याचे दिसते. कारण चेकवर खाते क्रमांकही दिसत आहे. पण न्यूज १८ मराठीने हा चेक खरा असल्याची सत्यता तपासलेली नाही.
advertisement
काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाची डिपॉझिट स्लिप व्हायरल झाली होती. ज्यात एका महिलने रोख/चेकच्या तपशीलात लिहिलं आहे तेथे मला माझ्या पतीसोबत जत्रेत फिरायला जायचं आहे, असे म्हटले होते. याशिवाय राशी रकाण्यात कुंभ लिहिलं आहे. म्हणजेच, तिनं तिच्या कुंडलीतील रास सांगितली आहे. खाली जिथं टोटल पैशाची रक्कम लिहायची होती, तिथं तिनं कुंभमेळा लिहिलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Bank Cheque Viral: महिला बँकेत पैसे काढण्यासाठी आली, चेकमधील तपशील वाचून कॅशियरला घाम फुटला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement