'माझ्यामुळे मॅच हरलो...'; सचिन तेंडुलकर शाळेतील मुलासारखा रडला, Pain Killer घेऊन झळकावले होते शतक
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India vs Pakistan Rivalry: 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीवर संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल. या लढतीच्या आधी जाणून घेऊयात IND vs PAK Rivalry मधील एक अफलातून किस्सा.
चेन्नई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मॅच म्हणजे संपूर्ण जगभरातील चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. येत्या 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होत आहे. या वर्षीचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी भारताच्या लढती या दुबईमध्ये होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांची लढत 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट Rivalry चा इतिहास 70 वर्षाहून अधिक जुना आहे. दोन्ही संघातील क्रिकेटची लढत मैदानावर होत असली तरी यात दोन्ही देशातील नागरिक सहभागी असते.
India vs Pakistan Rivalry मध्ये आज अशा एका मॅचबद्दल जाणून घेऊयात ज्याच्या निकालानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका लहान मुलासारखा ढसाढसा रडला होता. ही घटना आहे 1999 सालची, तेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होती. दोन्ही संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी चेन्नईत झाली.
वर्ल्डकप विजेत्या कॅप्टनचे पदार्पण अन् पाकिस्तानला लोळवलं;INDvsPAKची पहिलीच वनडे
टॉस जिंकून पाकिस्तान संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 238 धावा केल्या. उत्तरादाखल भारताने 254 धावा केल्या आणि किरकोळ आघडी घेतली. दुसऱ्या डावात पाकिस्तानने 286 धावा करत भारताला विजयासाठी 271 धावांचे टार्गेट दिले. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात शाहीद आफ्रिदीने 141 धावांची खेळी केली होती.
advertisement
चेन्नईसारख्या भारताचा बालेकिल्ला असलेल्या मैदानावर संघ जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा त्यांची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताचा निम्मा संघ फक्त 82 धावांवर माघारी परताल होता. सदागोपन रमेश, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली हे दिग्गज फलंदाज बाद झाले होते. मैदानावर सिचन तेंडुलकर आणि नयन मोंगिया फलंदाजी करत होते. भारताचा पराभव निश्चित होता. फक्त तो किती धावांनी याची पाकिस्तान वाट पाहत होता.
advertisement
भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने लाज काढून घेतली होती
अशात क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय अशी शतकी खेळी सचिन तेंडुलकरने केली. त्यान नयन सोबत सहाव्या विकेटसाठी 136 धावांची भागिदारी केली. नयन 52 धावांवर बाद झाला. त्यानंतर अनिल कुंबळे सोबत सचिनने संघाला 250च्या पुढे पोहोचवले. मास्टर ब्लास्टर सचिनने पाकिस्तानच्या तोंडातील विजयाचा घास काढून घेतला होता. मात्र तेव्हाच भारताला मोठा धक्का बसला. सकलेन मुश्ताकने सचिनला 136 धावांवर बाद केले. सचिनने 273 चेंडूत 18 चौकारांसह ही खेळी केली. सचिन 405 मिनिटे मैदानावर फलंदाजी करत होता. या लढतीत सचिनला पाठ दुखीचा त्रास होता. त्याने Ice Cube आणि पेनकिलर घेऊन टीम इंडियाला विजयाच्या जवळ पोहोचवले होते.
advertisement
सचिन बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 95 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा हव्या होत्या. मात्र तळातील तिघा फलंदाजांना या 16 धावा करता आल्या नाहीत आणि भारताने ही लढत 12 धावांनी गमावली.भारताच्या दुसऱ्या डावात सचिन, मोगिया आणि द्रविड वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नव्हती.
मॅच झाल्यानंतर जेव्हा सामनावीर पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरचे नाव पुकारण्यात आले तेव्हा तो पुरस्कार घेण्यासाठी आला नाही. राज सिंह डूंगरपुर यांनी प्रशिक्षक रमाकांत गायकवाड यांना निरोप पाठवला सचिनला सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी बोलवा. यावर गायकवाड म्हणाले, तो पुरस्कार घेण्यासाठी येऊ शकत नाही कारण तो रडतोय. जेव्हा डुंगरपुर डेसिंग रुममध्ये गेले तेव्हा सचिन एका शाळेतील मुलासारखा रडत बसला होता. ते म्हणाले, सर्व दोष तू स्वत:वर का घेतोस? तुला शक्य होते ते तू केलेस, जा आणि सामनावीर पुरस्कार घे. त्यावर सचिन म्हणाला- नाही सर, माझ्यामुळे ही मॅच गमावली. सचिन तेव्हा सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आला नाही.
advertisement
या सामन्यात भारताचा 12 धावांनी पराभव झाला होता. आणि पाकिस्तान संघाने तब्बल 36 धावा अतिरिक्त म्हणून दिल्या होत्या. भारतीय डावात सचिनने सर्वाधिक 136, मोंगियाने 52 आणि त्यानंतर अतिरिक्त धावा सर्वाधिक होत्या.
चेन्नई कसोटीतील विजयासह पाकिस्तानने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही संघात दिल्लीत दुसरी कसोटी झाली ज्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एक दुर्मिळ विक्रम झाला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 03, 2025 4:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'माझ्यामुळे मॅच हरलो...'; सचिन तेंडुलकर शाळेतील मुलासारखा रडला, Pain Killer घेऊन झळकावले होते शतक