advertisement

Vadapav Girl : अफेअर, घटस्फोट अन् आता....वडापाव गर्लनं दुसऱ्या नवऱ्यासाठी बदलला धर्म? Video शेअर होताच रंगली चर्चा

Last Updated:

कधी पतीसोबतचा वाद, कधी 'मिस्ट्री मॅन'सोबतचे रोमँटिक व्हिडिओ, तर कधी धर्मपरिवर्तनाच्या अफवा... चंद्रिकाच्या आयुष्यात सध्या चित्रपटापेक्षाही मोठा ड्रामा सुरू आहे. पण आता या सर्व वादांवर पडदा टाकण्यासाठी चंद्रिकाने एक मोठं विधान केलं आहे.

वडापाव गर्ल कॉन्ट्रोवर्शीअल व्हिडीओ
वडापाव गर्ल कॉन्ट्रोवर्शीअल व्हिडीओ
मुंबई : सोशल मीडियाचं जग जितकं चकाचक दिसतं, पडद्यामागचं सत्य तितकंच गुंतागुंतीचं असतं. एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीला कधी कौटुंबिक वादाचा सामना करावा लागतो, तर कधी त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. सध्या असंच काहीसं घडतंय दिल्लीची प्रसिद्ध 'वडापाव गर्ल' म्हणजेच चंद्रिका दीक्षित हिच्या बाबतीत. गेल्या काही दिवसांपासून चंद्रिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर सतत ट्रेंड होत आहे.
कधी पतीसोबतचा वाद, कधी 'मिस्ट्री मॅन'सोबतचे रोमँटिक व्हिडिओ, तर कधी धर्मपरिवर्तनाच्या अफवा... चंद्रिकाच्या आयुष्यात सध्या चित्रपटापेक्षाही मोठा ड्रामा सुरू आहे. पण आता या सर्व वादांवर पडदा टाकण्यासाठी चंद्रिकाने एक मोठं विधान केलं आहे.
कोण आहे तो 'मिस्ट्री मॅन'?
काही दिवसांपूर्वी चंद्रिकाने एका व्यक्तीसोबतचे रोमँटिक व्हिडिओ शेअर केले होते, ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. अनेकांनी असा दावा केला की, चंद्रिकाने तिच्या पतीला (युगम गेरा) सोडून या नवीन व्यक्तीसाठी धर्मपरिवर्तन केलं आहे. या मिस्ट्री मॅनचं नाव अनस सैफी असल्याचं आता समोर आलं आहे. एका व्हिडिओमध्ये चंद्रिका चक्क बुर्का घालून दिसली होती, तर अनसच्या कपाळावर टिळा होता. यामुळे 'लव्ह जिहाद'सारख्या चर्चांनाही उधाण आलं होतं.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Chandrika Gera (@chandrika.dixit)



advertisement
हा सर्व गदारोळ वाढल्यानंतर चंद्रिकाने आता स्पष्टीकरण दिलं आहे. एका मध्यस्थाच्या (हाफिज) मदतीने तिने आपली बाजू मांडली. "आम्ही सोशल मीडिया क्रिएटर आहोत, त्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा रिल्स बनवावे लागतात. याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत किंवा अनस माझा पती झाला आहे," असं चंद्रिकाने स्पष्ट केलं. "मी आजही तीच दीक्षित ब्राह्मण मुलगी आहे, मी कोणताही धर्म बदललेला नाही," असं सांगत तिने अफवांना पूर्णविराम दिला.
advertisement
पती युगमसोबत पुन्हा संसार थाटण्याची इच्छा
चंद्रिकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे तिने आपल्या पतीकडे परत जाण्याची व्यक्त केलेली इच्छा. मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीने युगमला आवाहन केलं आहे की, "तुमच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी मी पुढाकार घेतो. चंद्रिकाला तिचं घर आणि संसार वाचवायचा आहे. अनस आणि चंद्रिका फक्त एकत्र काम करतात, त्यांच्यात दुसरं कोणतंही नातं नाही."
advertisement
चंद्रिकानेही भावनिक होत म्हटलं की, "मला धोका मिळाला, मी खूप दुखावले गेले आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी देखील कोणाची फसवणूक करेन. मला माझ्या पतीसोबत पुन्हा नातं जोडायचं आहे."
रिल्सचं गणित की नात्यांची गुंतागुंत?
सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी अनेकदा क्रिएटर्स अशा प्रकारचे 'कंट्रोव्हर्शियल' व्हिडिओ बनवतात. चंद्रिका आणि अनसनेही असेच व्हिडिओ बनवल्याचं आता समोर येतंय. पण या नादात चंद्रिकाचं वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आलं आहे. तिच्या पतीनेही तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला होता, ज्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळलं होतं.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Chandrika Gera (@chandrika.dixit)



advertisement
चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण
चंद्रिका दीक्षितच्या या नव्या व्हिडिओनंतर चाहते संभ्रमात आहेत. हा खरोखर पश्चात्ताप आहे की पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला नवा स्टंट? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, चंद्रिकाने आता तिची भूमिका स्पष्ट केल्यामुळे या वादावर तात्पुरता पडदा पडल्याचं चित्र आहे.
डिजिटल युगात 'फेम' मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवताना खाजगी आयुष्याची होणारी होरपळ ही मोठी किंमत आहे. चंद्रिका दीक्षित आता आपल्या विस्कळीत झालेल्या संसाराची घडी पुन्हा कशी बसवते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Vadapav Girl : अफेअर, घटस्फोट अन् आता....वडापाव गर्लनं दुसऱ्या नवऱ्यासाठी बदलला धर्म? Video शेअर होताच रंगली चर्चा
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement