Indian Railway : OMG! वंदे भारतच्या स्लीपर कोचमध्ये गेला आणि दिसलं असं दृश्य, तरुणाने VIDEO च बनवला, झाला तुफान VIRAL

Last Updated:

Indian Railway Vande Bharat Video : वंदे भारतचा नवीन अतिरिक्त 1 एसी कोच लाँच केला. या लाँचिंगला एक व्लॉगर देखील उपस्थित होता, ज्याने वंदे भारतच्या स्लीपर कोचचा व्हिडिओ बनवला

News18
News18
नवी दिल्ली : 2019 मध्ये लाँच झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेस, गेल्या 6 वर्षात वंदे भारत गाड्यांनी रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास पूर्णपणे बदलून टाकला आहे. याची स्लीपर आवृत्ती आता भारतीय रेल्वेच्या रुळांवर धावण्यासाठी सज्ज आहे. नवी दिल्लीतील 16 व्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनात (आयआरईई) भारत-रशिया संयुक्त उपक्रम किनेट सोल्युशन्सने वंदे भारतचा नवीन अतिरिक्त 1 एसी कोच लाँच केला. या लाँचिंगला एक व्लॉगर देखील उपस्थित होता, ज्याने वंदे भारतच्या स्लीपर कोचचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
व्लॉगरने वंदे भारतच्या या स्लीपर कोच ट्रेनबद्दल बरंच काही सांगितले आहे. वंदे भारतच्या एक एसी स्लीपर कोचबद्दल बोलताना, कंटेंट क्रिएटर म्हणाले, "वंदे भारतच्या स्लीपर व्हर्जनचा आतील भाग पाहिल्यानंतर, फक्त एकच शब्द आहे: अद्भुत. काइनेक्टने डिझाइन केलेला हा प्रोटोटाइप 160 किमी प्रतितास ते कमाल 180 किमी प्रतितास वेग गाठू शकतो. लवकरच तुम्हाला तो ट्रॅकवर धावताना दिसेल."
advertisement
नवीन स्लीपर वंदे भारतची रचना आधुनिक, आकर्षक आणि प्रवाशांसाठी अनुकूल दिसते. व्लॉगरच्या व्हिडिओमध्ये, फर्स्ट-क्लास केबिन प्रीमियम दिसते, आरामदायी सीट्स, वॉटर बॉटल होल्डर, रिडिंग लाइट्स आणि चार्जिंग पॉइंट्स दिसतात.
advertisement
@journeyswithak नावाच्या एका युझरने ही रील इंस्टाग्रामवर पोस्ट केली आणि लिहिलं, "वंदे भारतचे स्लीपर फर्स्ट क्लास केबिन, जिथे लक्झरी आणि टेक्नॉलॉजी एकत्र येतात! आकर्षक डिझाइन, उत्कृष्ट आराम आणि जागतिक दर्जाच्या सुविधा या केबिनला खरोखरच आकर्षक बनवतात. ही वंदे भारत म्हणजे शैली, जागा आणि स्मार्ट प्रवासाचं परिपूर्ण मिश्रण आहे!"
advertisement
वंदे भारत स्लीपर कोचचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ही ट्रेन दिल्ली आणि पटना दरम्यान धावू शकते. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज हजारो लाईक्स मिळाले आहेत. तुम्हाला ही ट्रेन कशी वाटली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Indian Railway : OMG! वंदे भारतच्या स्लीपर कोचमध्ये गेला आणि दिसलं असं दृश्य, तरुणाने VIDEO च बनवला, झाला तुफान VIRAL
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement